atul londhe target mahayuti for state rain confition
नाशिक : राज्यामध्ये परतीचा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. पावसामुळे पुणे आणि मुंबई सारखी शहर ठप्प पडली असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून कंबरेएवढे पाणी रस्त्यावर साचले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पावसामुळे अमित शाह यांच्या ताफ्यामध्ये बदल झाला. यामुळे आता विरोधकांनी देखील टोला लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा केला आहे. नाशिकमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काही कानमंत्र दिले. महायुतीम्हणून एकत्र काम करण्याची सूचना अमित शाह यांनी दिल्या. यानंतर अमित शाह यांचा ताफा मार्गस्थ होत असताना रस्त्यावर पाणी साचले होते. यावेळी ताफ्याचा रस्ता बदलण्यात आला. याचा व्हिडिओ कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अतुल लोंढे यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.
अतुल लोंढेची पोस्ट
कॉंग्रेस नेते अतुल लोंढे व्हिडिओ यांनी सोशल मीडियावर एका वाहिनीचा व्हिडिओ शेअर करत सरकारला टोला लगावला आहे. अमित शाह यांच्या ताफ्याने ताफ्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहून वाट बदलली. याचा व्हिडिओ शेअर करत अतुल लोंढे यांनी लिहिले आहे की, नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या विकासावर अमित शहांचा विश्वास नाही का? शाह यांचा ताफा रस्त्याच्या कडेला निघून गेला. मधूनच गेलो असतो तर कदाचित विकास मिळाला असता, असा खोचक टोला लगावला आहे.
नासिक ,महाराष्ट्र
अमित शाह को नितिन गडकरी ,एकनाथ शिंदे के विकास पर भरोसा नहीं क्या??
शाह का काफिला निकला सड़क के किनारे से
बीच से जाते तो शायद विकास मिल जाता pic.twitter.com/98dlURS9Ap— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) September 25, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये रस्ते तुंबत नाही. जिथे काम असेल तिथे मी रस्त्यावर उतरुन काम करतो, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर अवघ्या 1 तासांच्या पावसामुळे मुंबईची रस्ते वाहतूक आणि रेल्वेचे वेळापत्रक देखील बिघडले. याचे अनेक व्हिडिओ देखील नेटकऱ्यांनी शेअर केले आहे. मुख्यमंत्री यांची भूमिका आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर मुंबईतील रस्त्यामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. याचे अनेक व्हिडिओ समोर आले असून विरोधकांनी खडेबोल सुनावले आहेत.
मुख्यमंत्री काल इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये सांगत होते.
मै Field पे जाके काम करता हूं, काम का जायजा लेता हूं
2 तासात सगळी पोल खोल झाली. pic.twitter.com/Rn9if4DFbs— Shekhar (@Shekharcoool5) September 26, 2024