Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी, हर्षवर्धन सकपाळ सरकारवर भडकले!

पुन्हा परभणी जिल्ह्यातील मानवत मध्ये डिजेलसाठी नागरिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची व्हिडियो समोर येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By विवेक
Updated On: May 24, 2026 | 04:07 PM
Congress leader H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government over petrol diesel shortage, petrol diesel shortage, H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government

Congress leader H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government over petrol diesel shortage, petrol diesel shortage, H,narshvardhan Sakpal slams Maharashtra Government

Follow Us
Follow Us:
  • इंधन तुटवड्यावरून राज्यात सुरु असलेल्या गोंधळाचे अनेक व्हिडियो व्हायरल, इंधन टंचाईचे भीषण वास्तव समोर
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर निशाणा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
सोशल मीडियावर सध्या इंधन तुटवड्यावरून राज्यात सुरु असलेल्या गोंधळाचे अनेक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत शेकडो लोक हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपच्या दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. या व्हिडियोवरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली होती. आता पुन्हा परभणी जिल्ह्यातील मानवत मध्ये डिजेलसाठी नागरिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची व्हिडियो समोर येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ ठरले आहे,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे. पेट्रोल डिझेल तुटवडयावरून तसेच गेल्या आठ दिवसात तीनवेळा झालेल्या इंधन दरवाढीवरून आता नागरिक चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांमध्ये इंधन तुटवड्यावरून तणावाचे वातावरण असून शेतकरीवर्गातदेखील इंधन तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. पेरणीपूर्वीच ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. ग्रामीण भागात विशेष करून परभणी, हिंगोली, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी सुरू असल्याची चित्रे आज सर्रास मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहेत. इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ आणि कृतिशून्य ठरले असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरत असून… pic.twitter.com/ET1VLhuGpt — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) May 24, 2026

काय म्हणाले हर्षवर्धन सकपाळ?

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हर्षवर्धन सकपाळ यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, “डिझेल-पेट्रोलसाठी जनतेमध्येच हाणामारी सुरू असल्याची चित्रे आज सर्रास मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहेत. इंधनाबाबत सरकारचे नियोजन पूर्णपणे ढिसाळ आणि कृतिशून्य ठरले असून सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरत असून तातडीने नियंत्रण न मिळवल्यास हे प्रकार आणखी गंभीर होण्याची भीती आहे,” असे ते म्हणाले.

“१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना…” इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा

फडणवीसांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलत पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

“देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर ‘सर्कस’ सुरू,” इंधन टंचाईवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा  

Web Title: Congress leader harshvardhan sakpal slams maharashtra government over petrol diesel shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • devendra fadamvis
  • Diesel Petrol Price
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
2

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.