Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kharge Apologizes to Gujarati : आधी गुजरात्यांना म्हटले ‘बेवकुफ’ अन् नंतर मागितली माफी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चेत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुजराती लोकांबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 05:03 PM
congress Mallikarjun Kharge apologizes on Gujarati People controversial statement

congress Mallikarjun Kharge apologizes on Gujarati People controversial statement

Follow Us
Close
Follow Us:
  • मल्लिकार्जुन खरगे यांचे गुजराती व्यक्तींबाबत वादग्रस्त विधान
  • राजकीय वर्तुळातून जोरदार टीका
  • खरगे यांनी मागितली गुजराती समाजाची माफी
 

Mallikarjun Kharge Apologizes to Gujarati People : नवी दिल्ली :  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. खरगे हे केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजराती समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. काँग्रेस (Congress News) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मोदी सरकारसमोर झुकले असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून केली जात आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे, परंतु त्यांना त्याबद्दल खेद वाटतो. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काँग्रेस अध्यक्षांनी लिहिले, “माझ्या निवडणूक भाषणातील काही वक्तव्यांचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे. तरीही, मी जबाबदारी स्वीकारून माझ्या वतीने खेद व्यक्त करतो.”

हे देखील वाचा : निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा

आपल्या सोशल मीडियावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिले की, “केरळमध्ये मी नुकत्याच दिलेल्या एका निवडणूक भाषणातील काही वक्तव्ये हेतुपुरस्सर चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहेत. तरीही, मी मनापासून खेद व्यक्त करतो. गुजरातच्या लोकांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च आदर होता आणि तो नेहमीच राहील. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता, अशा शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह

केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार करत असताना मल्लिरकार्जुन खरगे यांनी एका सभेला संबोधित केले, ज्यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मात्र, यावेळी त्यांनी गुजरातच्या लोकांचा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला. खरगे म्हणाले की, “मोदीजी, तुम्ही गुजरातच्या निरक्षर लोकांना फसवू शकता, पण केरळच्या लोकांना फसवू शकत नाही. असे वक्तव्य खरगे यांनी केले.

Some remarks of mine in a recent election speech in Kerala are being deliberately misinterpreted. Even so, I express my sincere regret. It was never my intention to hurt the sentiments of the people of Gujarat for whom I have always had and will continue to have the highest of… — Mallikarjun Kharge (@kharge) April 8, 2026

भाजप नेत्यांकडून खर्गेंच्या                    

काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, गुजरातविरोधी द्वेष विरोधी पक्षाच्या डीएनएमध्येच आहे असा आरोप करत त्यांनी माफीची मागणी केली. खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचाही समावेश होता. गांधीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, खर्गे यांनी केवळ गुजरातच्या लोकांचाच अपमान केला नाही, तर महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पवित्र भूमीच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवला आहे.

‘६५ दशलक्ष गुजराती लोकांचा अपमान’
पटेल पुढे म्हणाले की, अशी वक्तव्ये आक्षेपार्ह आणि दुर्दैवी आहेत. त्यांनी (खर्गे) केवळ ६५ दशलक्ष गुजराती लोकांचाच अपमान केला नाही, तर महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पवित्र भूमीच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवला आहे. अशा वक्तव्यांमुळे राज्यातील लोकांचा अपमान झाला असून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.

Web Title: Congress mallikarjun kharge apologizes on gujarati people controversial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Gujrati
  • Mallikarjun Kharge
  • political news

संबंधित बातम्या

डिजीटल अरेस्ट पेक्षा घातक ज्योतिषीय अटक? भोंदूबाबा समाजात पसरवतायेत विष, महिला पडतायेत बळी
1

डिजीटल अरेस्ट पेक्षा घातक ज्योतिषीय अटक? भोंदूबाबा समाजात पसरवतायेत विष, महिला पडतायेत बळी

Massajog Sarpanch By-election : मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर; संतोष देशमुख यांना गावकरी न्याय देणार?
2

Massajog Sarpanch By-election : मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर; संतोष देशमुख यांना गावकरी न्याय देणार?

शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’; महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’, कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत
3

शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’; महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’, कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत

Political News : “संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण…; शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
4

Political News : “संसदीय कारकीर्दीची 59 वर्षे पूर्ण…; शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.