Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahdev Betkar in Shivsena : उबाठाचा मित्रपक्षालाच दणका; रत्नागिरीतील मोठा नेत्याने बांधले शिवबंधन

Sahdev Betkar in shivsena : कॉंग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 01:43 PM
Congress party leader Sahdev Betkar joins Shiv Sena Thackeray faction

Congress party leader Sahdev Betkar joins Shiv Sena Thackeray faction

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष हे पक्ष आणि संघटन मजबूतीच्या मागे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांचा गट देखील यासाठी प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाला शह देत रत्नागिरीतील मोठा नेत्याचा पक्षप्रवेश करुन घेतला आहे.

सहदेव बेटकर ठाकरे गट प्रवेश

कॉंग्रेस पक्षाचे नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. गुहागरमधील महत्त्वपूर्ण नेते मानल्या जाणाऱ्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी देखील ते शिवसेनेमध्ये होते.  आता कॉंग्रेसमधून त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.  सहदेव बेटकर यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षप्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर ह्यांचा जाहीर पक्षप्रवेश । प्रमुख उपस्थिती – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । मातोश्री, मुंबई – #LIVE https://t.co/tGfNJgTcyW

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 8, 2025

सहदेव श्रीकृष्णाच्या जवळ आला

यावेळी खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले की, “या पक्षप्रवेशावेळी सर्व कोकणचे सुपुत्र येथे उपस्थित आहेत. यामध्ये आता आपल्या सहदेवांची भर पडली आहे. महाभारतातील तीन प्रमुख पात्र येथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, आणि संजय व सहदेव देखील आहेत. महाभारतामध्ये सहदेव हे फार महत्त्वाचं पात्र होतं. धर्मराज्याच्या अत्यंत जवळच कोण असेल कर ते सहदेव होते. आता सहदेव श्रीकृष्णाच्या जवळ आला आहे. सहदेवांच्या येण्याने कुरुक्षेत्रावरील हे नवीन महायुद्ध सुरु झाले आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत. कोकणातील युद्ध आपण जिंकणार आहोत. सहदेवांना सांगितलं आहे की हे शेवटचे मैदान, आता मैदान बदलायचं नाही.  आता याच मैदानातून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण भगवा करायचा आहे. हे ठेकेदारांचं राज्य संपवून टाकायचं आहे,” अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना कोकण दौरा करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “तुम्ही फक्त एकदा कोकणचा दौरा करा. कोकणाच्या धर्तीवर एकदा पाऊल ठेवले तर बघा यांची कशी दणादण उडते. एक गद्दार राहणार नाही. सत्तेची भीती आम्हाला नका दाखवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केल्या आहेत. ही पहिली वेळ नाही. लढणाऱ्या शिवसैनिकांना ताकद द्यायची आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी सहदेव बेटकर यांचे पक्षामध्ये स्वागत केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी सहदेव बेटकर म्हणाले की, “1992 पासून मातोश्री ही माझी आहे. मोठ्या साहेबांचं दर्शन घेतल्यापासून तेव्हापासून मी या कुटुंबामध्ये आहे. मी कुठेही नाराज नाही. मी कधीही माझ्या कुटुंबावर टीका केली नाही. मी परत माझ्या घरात आलो आहे. रत्नागिरी जिल्हा हा आपल्या पाठिशी आहे. रत्नागिरीमध्ये आपलं नाव काढल्याशिवाय राहणार नाही,” अशा भावना सहदेव बेटकर यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Congress party leader sahdev betkar joins shiv sena thackeray faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • political news
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
1

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
3

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.