Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुंगी गुडिया’ वरून राजकारण पेटले, काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा वाद; सुनेत्रा पवारांवरील टीकेला अजित पवार गटाचा पलटवार

सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसने केलेल्या 'गुंगी गुडिया' या टीकेवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी इंदिरा गांधींचा संदर्भ देत काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 04:03 PM
suneitra pawar

suneitra pawar

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची ‘गुंगी गुडिया’ अशी टीका
  • राष्ट्रवादीकडून इंदिरा गांधींचा संदर्भ देत काँग्रेसवर पलटवार
  • महिला नेत्यांविषयीच्या राजकीय भाषेवर नव्याने चर्चा
 

राज्यातील राजकीय वातावरणात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जोरादार वाद रंगू लागला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर सोशल मीडियावर बोचरी टीका केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्ष वादात सापडला असून यावरून राष्ट्रवादीने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून सुनेत्रा पवारांवर टीका करताना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. त्यामुळे हा वाद उफाळून आला असून यावरून काँग्रेसवर चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार होताना दिसत आहे.

Sanjay Raut On PM Modi: नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

नेमकं प्रकरण काय?

वादाची सुरुवात काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरील एका पोस्टमुळे झाली. काही दिवसांपूर्वी बीड दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत पत्रकार परिषद संपवली. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” असे संबोधले आणि त्या स्वतंत्र भूमिका कधी मांडणार, असा सवाल उपस्थित केला.

सुनेत्रा पवार, अजून किती दिवस “गुंगी गुडिया” बनून राहतील ! pic.twitter.com/1Cgj9dZfBq — Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 3, 2026


या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. पक्षाचे प्रवक्ते उमेश पवार यांनी काँग्रेसवर टीका करत “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग नवीन नसल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विरोधकांनी त्यांच्यासाठीही हा शब्दप्रयोग वापरला होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी आपल्या कामगिरीतून त्या टीकेला उत्तर दिले होते.

इंदिरा गांधींचा दाखला देत राष्ट्रवादीकडून पलटवार

उमेश पवार यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, ज्या शब्दप्रयोगाला काँग्रेसने त्या काळी महिलेचा अवमान मानले होते, त्याच शब्दांचा वापर आज काँग्रेस स्वतः एका महिला लोकप्रतिनिधीविरुद्ध का करत आहे? यामुळे काँग्रेसची भूमिका विरोधाभासी असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोठी बातमी ! काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा; पक्षावर केला विश्वासघाताचा आरोप

तसेच, इंदिरा गांधींवरील त्या काळातील टीका योग्य होती, असे काँग्रेस आता अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. हा विषय केवळ एका पक्षापुरता मर्यादित नसून सार्वजनिक जीवनातील महिलांविषयीच्या राजकीय संवादाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवनात महिलांचा सन्मान राखत राजकीय टीका व्हावी आणि संबंधित शब्दप्रयोग काँग्रेसने मागे घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टीकेमुळे आणि त्यानंतर राष्ट्रवादीने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आगामी काळात या वादावर दोन्ही पक्षांकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, महिला नेत्यांविषयी राजकीय भाष्य करताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Congress sunetra pawar gungi gudiya row ncp ajit pawar response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
3

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.