
DCM Eknath shinde leader upset in mahayuti for not getting Development Fund maharashtra political news
मागील आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मतभेद झाल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी एकाच मंचावर असून एकमेकांशी बातचीत न केल्याने हा वाद वाढल्याचे दिसून आले. तसेच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी करत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला. यानंतर मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी हे वाद मिटल्याचे देखील समोर आले. मात्र आता शिंदे गटामध्येच वाद निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं
मीडिया रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील दुसऱ्या टर्मचे शिवसेना आमदारांना निधीसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. हीच परिस्थिती विधान परिषदेचे आमदार आणि मंत्री यांच्याबाबत देखील आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना सत्तेमध्ये असून देखील विकास निधीसाठी खूप वाट बघावी लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सत्तेमध्ये असून देखील एकनाथ शिंदे यांचे नेते हे नाराज असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ भाजप आहे तर राज्याच्या तिजोरीची चावी ही अजित पवारांकडे आहे. या राजकीय परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे.
हे देखील वाचा : प्रकाश महाजन करणार भाजप प्रवेश? म्हणाले, “मी राज ठाकरेंना घाबरत नाही अन्…
निधीची कमतरता हा मुद्दा अनेकदा समोर आला आहे. याचा थेट परिणाम पुढील निवडणुकीत याचे होण्याची शक्यता आहे. ती खंत आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढावा अशी विनंती शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा आहे तसेच लाडकी बहिण योजनेसाठी निधी दिला जात असल्याने अनेक विकास कामे प्रलंबित आहेत अशी तक्रार शिंदे गटाच्या नेत्यांनी केली आहे.