Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

मिसिंग लिंक प्रकल्पावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. 'मी शिव्याप्रूफ आहे' असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले, तर प्रकल्प हा भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 04:10 PM
'हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले'; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

'हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले'; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

Follow Us
Follow Us:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर परिणाम झाला. याचदरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पात भूस्खलन झाल्याने हा मार्ग जवळपास 20 तास बंद ठेवावा लागला. या घटनेनंतर विरोधकांनी प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत विरोधक आणि ट्रोलर्सवर निशाणा साधला.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.

‘मिसिंग लिंक हा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना’

फडणवीस यांनी सांगितले की, “मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सर्वात उंच पूल आणि जगातील मोठ्या बोगद्यांपैकी एक उभारण्यात आला असून घाट विभागातील अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.”

‘ही तर शिंदे सेनेची गुंडशाही, केवळ FIR नव्हे, तर थेट…’, प्रियांका चतुर्वेदी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

भूस्खलनामुळे कमान पडली, पुलाला तडा गेला नाही

मुख्यमंत्री म्हणाले की, “मुसळधार पावसामुळे दरडीचा मलबा आल्याने कमानीचा काही भाग कोसळला, मात्र पुलाला कोणताही तडा गेला नाही. अवघ्या 18 तासांत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. तरीही विरोधकांनी सात हजार कोटी रुपये पाण्यात गेले” असा अपप्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

‘मी शिव्याप्रूफ आहे’; ट्रोलर्सना फडणवीसांचे प्रत्युत्तर

सोशल मीडियावरील टीकेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल. मी शिव्याप्रूफ आहे.” पुढील दहा वर्षांनी टीका करणारे दिसणार नाहीत, मात्र मिसिंग लिंक प्रकल्प आणि तो उभारणाऱ्या नेतृत्वाची नोंद इतिहासात राहील, असेही त्यांनी म्हटले. ट्रोलर्सवर निशाणा साधत ते म्हणाले, “पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात. माझी बदनामी करा, हरकत नाही; पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही,” असा इशारा दिला.

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Web Title: Devendra fadnavis missing link trolls maharashtra assembly statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Monsoon Session
  • Missing Link Project
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील
1

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’
2

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला
3

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; सक्तीच्या धर्मांतराला आळा, कायद्यात काय तरतुदी?
4

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; सक्तीच्या धर्मांतराला आळा, कायद्यात काय तरतुदी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.