
'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं'; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या कथित दानपेटी चोरीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात आयोजित केलेल्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मला आनंद आहे की उद्धवजींना शेवटी हे लक्षात आलं की ‘जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं’. ते पुन्हा रामाकडे परतले, याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो,” असे म्हटले.
यापुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र केवळ राजकीय कार्यक्रम न करता त्यांनी यावेळी तरी रामरक्षा पठण करावे, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
‘राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही’; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दरम्यान, पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे-शिरूर, हडपसर-यवत, चाकण-शिक्रापूर या उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
NEET परीक्षेतील गुण आणि ओएमआर शीटबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, परीक्षा प्रक्रिया अत्यंत वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पालकाला काही तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तक्रार निवारण यंत्रणेकडे जाऊन ती मांडावी, असे आवाहन त्यांनी केले.
महामार्ग प्रकल्पांविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की, या तीन प्रकल्पांमुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. काही ठिकाणी चार स्तरांचे रस्ते विकसित केले जात असून त्यामध्ये स्थानिक रस्ता, आउटर रिंग रोड, एलिव्हेटेड मार्ग आणि सर्वात वर मेट्रोचा समावेश असेल. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले असून यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात सुमारे 40 टक्के बचत होईल, असा दावाही त्यांनी केला.
‘सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका’; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल