Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटात; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित खासदारांना मतदारसंघ विकासासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली.

  • By विवेक
Updated On: Jul 18, 2026 | 08:43 PM
मोठी बातमी ! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटात; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी ! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटात; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या विलिनीकरणावर शिक्कामोर्तब केल्याने संबंधित खासदार आता अधिकृतपणे शिंदे गटाचे सदस्य म्हणून काम करणार आहेत.

या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांची लोकसभेतील स्थिती स्पष्ट झाली आहे. या खासदारांनी प्रथम स्वतंत्र गट स्थापन केला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा सचिवालयाच्या मंजुरीनंतर त्यांच्या विलिनीकरणाला घटनात्मक मान्यता मिळाली असून, ते आता अधिकृतपणे शिंदे गटाचे खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करतील.

‘जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं’; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

एकनाथ शिंडे यांची मोठी प्रतिक्रिया

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, या सहा खासदारांनी वैयक्तिक राजकारणासाठी नव्हे, तर आपल्या मतदारसंघांचा विकास अधिक वेगाने व्हावा या उद्देशाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्या जनतेने या खासदारांना निवडून दिलं आहे, त्यांच्या विकासकामांना प्राधान्य मिळणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडे आलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांसाठी आवश्यक तो मोठा विकासनिधी उपलब्ध करून दिला जाईल.”

‘सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका’; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेतील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकासकामांना गती मिळते का आणि या निर्णयाचे राज्याच्या राजकारणावर कोणते परिणाम होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Lok sabha approves six shiv sena ubt mps merger eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं’; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला
1

‘जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं’; उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा टोला

‘राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही’; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
2

‘राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही’; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

‘जनाब’ ते ‘बारा बुद्धीचे साहेब’; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
3

‘जनाब’ ते ‘बारा बुद्धीचे साहेब’; गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना जहरी खुले पत्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून दडपशाही, किरण काळेंचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.