'भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला'; राहुल गांधींचा खुले आव्हान
Rahul Gandhi Aggressive Speech Delhi Protest Election Commission : केंद्रीय निवडणूक आयु्क्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात निवडणूक आयोगावर आज मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस सह इंडिया आघाडी आणि इतर घटक पक्षांचे जवळपास ३०० हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्येय मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.
दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया अलायन्सच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आम्ही केवळ भाजपशी संघर्ष करणार नाही, तर त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करू. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकशाही संपवली आहे. ” आपल्या देशासोबत जे केले गेले आहे त्याला देशद्रोह म्हणतात आणि त्यातून कोणीही सुटू शकणार नाही.” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
यामुळे भारतीय निवडणूक आयोगाजवळील परिस्थिती अधिकाधिक तणावपूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. एनएसयूआयचे अनेक कार्यकर्ते आकाशवाणी भवनमध्ये पोहोचले होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया अलायन्सच्या खासदारांनी केलेल्या आंदोलनादरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, आजच्या आंदोलनात सुमारे ३०० विरोधी खासदार सहभागी झाले होते. “आम्हाला निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडण्यापासून रोखले जात आहे.”
मंगळवारी निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान एक अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी अचानक आकाशवाणी भवनच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी एका ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे, “आज सकाळी, ऑल इंडिया अलायन्सच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खासदारांना बळजबरीने थांबवले. सध्या, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वद्रा यांच्यासह इतर अनेक नेते, निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ऑल इंडिया रेडिओच्या आवारात आंदोलनावर बसले आहेत.”






