Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी अधिवेशनाआधी फडणवीसांचा विरोधकांना पलटवार; कर्जमाफीपासून नीट परीक्षेपर्यंत सर्व आरोपांना दिलं उत्तर

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कर्जमाफी, दुष्काळ, नीट परीक्षा आणि राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 08:42 PM
पावसाळी अधिवेशनाआधी फडणवीसांचा विरोधकांना पलटवार; कर्जमाफीपासून नीट परीक्षेपर्यंत सर्व आरोपांना दिलं उत्तर

पावसाळी अधिवेशनाआधी फडणवीसांचा विरोधकांना पलटवार; कर्जमाफीपासून नीट परीक्षेपर्यंत सर्व आरोपांना दिलं उत्तर

Follow Us
Follow Us:
  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (22 जून) सुरुवात
  • अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीकडून विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका केली स्पष्ट
 

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (सोमवार, 22 जून) सुरुवात होत असून त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार खडाजंगी रंगली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी कर्जमाफी, नीट परीक्षा प्रकरण आणि पावसाच्या संभाव्य तुटवड्यासह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याबद्दल खंत व्यक्त करत त्यांनी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्यापासून तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधक चहापानासाठी आले असते तर अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असती. राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि अधिवेशनात यासंदर्भात चर्चा होईल.”

Maharashtra Monsoon Session 2026 : अधिवेशनाआधीच राजकारण तापलं! महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार; १३ मुद्द्यांवरून सरकारला घेरलं

“प्रश्न विचारणे विरोधकांचा अधिकार, बिनबुडाचे आरोप नको“

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. “परिस्थितीनुसार कर्जमाफीचे निर्णय घ्यावे लागतात. तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 36 हजार 586 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असून त्याचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना झाला आहे. सरकारच्या निर्णयांवर प्रश्न विचारणे हा विरोधकांचा अधिकार आहे, मात्र बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही,” असे फडणवीस म्हणाले.

“कर्जमाफी हा आमच्यासाठी राजकीय विषय नाही”

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत, “राज्यातील अनेक प्रश्नांची विरोधकांना पुरेशी माहिती नाही. आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. कोणतीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असेही स्पष्ट केले.

ओमराजे निंबाळकरांचा मोठा संकेत! “मी निर्णय घेणार, तुम्ही पाठिशी उभे राहा”; शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण

दरम्यान, राज्यावर यंदा एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता वर्तवली जात असताना सरकारने यासाठी आवश्यक नियोजन केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकरी, पाणीटंचाई, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था आणि विविध विकासकामांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाल्याने आगामी तीन आठवडे विधानभवनात जोरदार खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Devendra fadnavis replies opposition allegations before monsoon session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Assembly Monsoon Session

संबंधित बातम्या

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील
1

Mumbai Metro 13: मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रोला मंजुरी; पुणे रिंगरोडच्या विस्तारालाही हिरवा कंदील

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’
2

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘फडणवीसांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, दिल्लीत का पाठवताय?’

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला
3

‘मी महाराष्ट्रातच राहणार, रिकामटेकड्यांना आनंद घेऊ द्या’; दिल्लीवारीच्या चर्चेवर फडणवीसांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; सक्तीच्या धर्मांतराला आळा, कायद्यात काय तरतुदी?
4

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; सक्तीच्या धर्मांतराला आळा, कायद्यात काय तरतुदी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.