कॉँग्रेसच्या अंतर्गत वादाचा भाजपला फायदा? (फोटो- सोशल मीडिया)
कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद
डिके शिवकुमार यांच्या पोस्टने वाद वाढण्याचा अंदाज
काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे लक्ष
कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अडीच वर्षांचा कराराची आठवण करून देत डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले आहे. हे प्रकरण दिल्लीट हायकमांडकडे गेले आहे. मात्र कॉँग्रेसमध्ये हा कलह सुरू असताना भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची शक्यता आहे.
अडीच वर्षांच्या कारारानुसार डिके शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॉँग्रेस नेतृत्वाला डिवचले आहे.
मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…
काय आहे डिके शिवकुमार यांची पोस्ट?
उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी पोस्टमध्ये शब्दाची ताकद हीच जगाची ताकद आहे. प्रत्येकाने आपल्या शब्दावर पक्के असणे आवश्यक आहे. आपल्या शब्दावर कायम राहणे हीच जगातील मोठी शक्ती आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी देखील त्यांच्या पोस्टमधून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले असल्याचे म्हटले जात आहे.
ಕೊಟ್ಟ ಮಾತು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇ ವಿಶ್ವದಲ್ಲಿರುವ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ! pic.twitter.com/klregNRUtv — DK Shivakumar (@DKShivakumar) November 27, 2025
कॉँग्रेसच्या परिस्थितीचा भाजप फायदा उठवणार?
कर्नाटकमध्ये कॉँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा वाद दिल्लीत पोहोचला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. दिल्लीत एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र या वादाचा फायदा भाजप घेणार का हे पहावे लागणार आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची चर्चा सुरू झाली आहे. डिके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर ते कोणता निर्णय घेणार? ते कॉँग्रेसमधून बाहेर पडणार का? याकडे भाजप लक्ष ठेवून असणार अशी चर्चा रंगली आहे.
मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…
दरम्यान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहे. मात्र सर्वांच्या नजरा या भाजपकडे खिळल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादाचा फायदा भाजप उठवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज नेत्याला आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन भाजप काही नवीन खेळी करणार का हे पहावे लागणार आहे.






