भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता (फोटो- Ai Gemini)
कर्नाटकमध्ये 48 तासांत कॉँग्रेस मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा
कॉँग्रेसच्या भांडणात भाजप भाकरी फिरवण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. कर्नाटक कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. अडीच वर्षानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान पुढील 48 तास कॉँग्रेससाठी अंतर्गतरित्या महत्वाचे समजले जात आहेत. मात्र या स्थितीचा भाजप फायदा घेते का हे पहावे लागणार आहे.
कर्नाटकमध्ये राजकारण तापले आहे. कॉँग्रेसमध्ये अंतर्गत मुख्यमंत्रीपदावरून कलह सुरू आहे. कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मौन सोडले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असे खरगे म्हणाले.
हायकमांडशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे अध्यक्ष खरगे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील 48 तासांत दिल्लीत एक महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांना दिल्लीत बोलावले जाण्याचा अंदाज आहे. सरकारची अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर हा कथित सत्ता वाटप कराराबद्दल हा वाद सुरू झाला आहे.
दरम्यान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहे. मात्र सर्वांच्या नजरा या भाजपकडे खिळल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादाचा फायदा भाजप उठवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज नेत्याला आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन भाजप काही नवीन खेळी करणार का हे पहावे लागणार आहे.
काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ
कर्नाटक विधानसभेत एक धक्कादायक राजकीय दृष्य पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मानली जाते. कॉंग्रेसकडून अनेकदा संघाचा कडाडून विरोध केला जातो. मात्र कर्नाटकमध्ये उलटे चित्र दिसून आले. कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सभागृहामध्ये ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही आरएसएस प्रार्थना गायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.






