Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Maharashtra Politics :  डोंबिवलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. पिंपळेश्वर मंदिरात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवबंधन बांधत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच विधान परिषदेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत खासदारांनी सकारात्मक संकेत दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2026 | 12:10 PM
डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेची मोठी इनकमिंग; भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Follow Us
Follow Us:
  • चार भाजपाच्या माजी नगरसेवकांसह शिंदेसेनेत मोठी इनकमिंग
  • डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ
  • शिवसेनेच्या विधान परिषदेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत खासदारांचे सकारात्मक संकेत
Dombivli Politics News Maarthi : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार यांच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य

नुकतेच राज्य सरकारने पिंपळेश्वर महादेव मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर हा निर्णय झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचे अभिषेक व दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली.पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतही सूचक वक्तव्य केले. शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत सकारात्मक संकेत देताना त्यांनी, सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो,असे म्हटले.

केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले राजकीय नशीब आजमावले होते. आता या सर्व नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशामुळे डोंबिवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असून येणाऱ्या काळासाठी हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या विधान परिषदेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत खासदारांनी सकारात्मक संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे. यामुळे आगामी राजकीय रणनीती, जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समन्वय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे डोंबिवलीतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत इतर पक्षांमधूनही आणखी इनकमिंग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Rohit Pawar News: ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना! कर्जमाफीवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

Web Title: Dombivli big political entry four former bjp corporators join shiv sena shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
1

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
4

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.