Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

भंडारा जिल्ह्यात डेंग्यू आणि हिवतापाचा धोका वाढण्याची शक्यता पाहता आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. यंदा 5 हिवताप आणि 7 डेंग्यू रुग्ण आढळले, पण विशेष म्हणजे दोन्ही आजारांमुळे एकही मृत्यू झालेला नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 07, 2026 | 05:56 PM
Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
Follow Us
Follow Us:
  • भंडारा जिल्ह्यात 2026 मध्ये हिवतापाचे 5 आणि डेंग्यूचे 7 रुग्ण आढळले आहेत.
  • दोन्ही आजारांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला.
  • डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी सर्वेक्षण, धूर फवारणी आणि विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत.
पावसाळ्यानंतर डेंग्यू आणि हिवतापाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत हिवतापाचे ५ आणि डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या दोन्ही आजारांमुळे जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही. रुग्णांचे वेळेत निदान व उपचार करण्यासोबतच बाधित परिसरातील सर्वेक्षण, रक्त तपासणी, डास नियंत्रण आणि जनजागृतीच्या माध्यमातून आजाराचा प्रसार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हिवतापाच्या तपासणीसाठी आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४० रक्तनमुने, तर डेंग्यूसाठी १ हजार ९१३ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत हिवतापाचे ५ आणि डेंग्यूचे ७ रुग्ण बाधित आढळले. संबंधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार करण्यात शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याबरोबरच बाधित परिसरातील इतर नागरिकांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जात आहे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नियंत्रणावर भर डेंग्यू आणि हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, टेमिफॉस अॅक्टिव्हिटी आणि गप्पी मासे सोडण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यास कर प्राधान्य देण्यात येत आहे. जून महिना हिवताप प्रतिरोध महिना, तर जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून विविध उपक्रम घेण्यात आले. २५ एप्रिल हिवताप दिन आणि १६ मे डेंग्यू दिनानिमित्तही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना हिवताप प्रतिबंधात्मक कालावधीपूर्वीच आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. रक्तनमुने आणि रक्तजल नमुने तपासणीसाठी आवश्यक साहित्य तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी लागणारी कीटकनाशकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे संशयित रुग्ण आढळल्यास तपासणी आणि उपचाराची प्रक्रिया वेगाने राबविणे शक्य होत आहे.

जिल्ह्यात डेंग्यू व हिवताप प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून सर्व स्तरांवर सातत्याने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बाधित गावांवर विशेष लक्ष डेंग्यू अथवा हिवतापाचा रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे रक्तनमुने आणि रक्तजल नमुने तपासले जात आहेत. संशयित रुग्णांची वेळेत तपासणी झाल्याने आजाराचे निदान लवकर होण्यास मदत होत आहे. बाधित रुग्णाच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करून आजाराचा पुढील प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Bhandara News: वीज गेली अन् ऑनलाइन परीक्षेचा बोजवारा! प्रवेशपूर्व परीक्षेत गोंधळ; परीक्षार्थी संतप्त, पोलिसांना पाचारण

खासगी रुग्णालयांतील रुग्णांचीही डेंग्यू व हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्व स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी, बाधित भागातील रक्तनमुने संकलन, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, धूर फवारणी आणि डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नागरिकांनीही घर व परिसरात पाणी साचू न देणे, पाणीसाठे नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

डेंग्यू आणि हिवताप हे नोटिफायबल आजार असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होते. संबंधित रुग्ण ज्या गावात राहत आहे, त्या ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतात. खासगी रुग्णालयांमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांच्या रक्त व रक्तजल नमुन्यांची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी करून आजाराचे निदान निश्चित केले जाते.

Web Title: Bhandara dengue malaria health department alert cases auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Bhandara
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
2

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी
3

Poonam Estate Navratri: बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
4

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.