ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
Election Commission of India: निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याती कोणत्याही विषयावर वैयक्तिक मते भिन्न असू शकतात. पण निवडणूक आयोगाकडे एसआयआर सह सर्व सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत.
Election Commission of India, ECI SIR Process, Gyanesh Kumar,
Follow Us
Follow Us:
मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगात मतभेदाच्या चर्चा होत्या
२ आयुक्तांनी १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांनी दिले स्पष्टीकरण
Election Commission Clarification On SIR Process : देशभरातील अनेक राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासंदर्भात (SIR) जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगामध्ये मतभेद चव्हाट्यावर आले होते. वृत्तांनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त एसआयआरशी संबंधित काही निर्णयांवर असहमत होते. या दोन निवडणूक आयुक्तांनी अनेक बैठकांमध्ये या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. अशी माहिती समोर आली होती. पण या सर्व चर्चांवर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
एसआयआर दरम्यान १० महिन्यांत या दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या कृतींवर १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा करणाऱ्या एका मीडिया वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. निवडणूक आयोगाच्या तीनही मुख्य आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. एसआयआरशी संबंधित सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले असून आयोगामध्ये कोणताही मतभेद नाही. एसआयआरसह सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या संमतीने घेण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांच्या मंजुरीने सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याती कोणत्याही विषयावर वैयक्तिक मते भिन्न असू शकतात. पण निवडणूक आयोगाकडे एसआयआर सह सर्व सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त या दोघांचीही संमती देण्यात आली होती, असेही सांगण्यात आले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयांमधील मतभेदांबाबत उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना निवडणूक आयुक्त म्हणाले काी मतभेत असले तरी सर्व निवडणूक आयुक्तांमध्ये एकमत झाल्यानंतरच निर्णय घेतले जातात.
माध्यमांच्या वृत्तात काय दावा करण्यात आला?
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी अनेक निर्णय आणि आदेशांवर आक्षेप घेतला होता. वृत्तानुसार, नोव्हेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत, या दोन आयुक्तांनी किमान १४ लेखी आक्षेप दाखल केले होते. या आक्षेपांमध्ये फॉर्म ६ मधील बदल, मतदार यादीतील नावांची भर आणि वगळणी, मतदार-संबंधित निर्णयांविरुद्ध अपील आणि निवडणूक डेटा मिळवण्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. वृत्तात असेही म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये, या दोन आयुक्तांनी त्यांच्या माहितीशिवाय निर्णय आणि आदेश कसे जारी केले गेले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश यांनाही कळवण्यात आले होते.
विरोधी पक्षांकडून प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी
या वृत्तानंतर, विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्या मर्जीनुसार निवडणूक आयोग चालवत आहेत. तीन सदस्यीय निवडणूक आयोगात केवळ ज्ञानेश कुमार यांचाच अंतिम निर्णय असतो. ज्ञानेश कुमार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून काम करतात, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.
Web Title: Election commission denies differences over sir voter list revision process