Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ‘काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर..’; सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis on Congress: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक! "काँग्रेस चर्चेत राहण्यासाठी खालच्या स्तरावर गेली," असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी चढवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 08:38 PM
Devendra Fadnavis: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (Photo Credit- AI)

Devendra Fadnavis: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • ‘काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर..’
  • सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
  • वाचा सविस्तर बातमी!
Devendra Fadnavis on Congress: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने (Congress) केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वादग्रस्त टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आता या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. “काँग्रेस पक्षाची ही टीका महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला अजिबात शोभणारी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला.

“बदनाम हुए तो क्या हुआ…” फडणवीसांचा काँग्रेसवर टोला

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकीयदृष्ट्या पूर्णपणे हतबल झाला आहे. “हे लोक अत्यंत खालच्या स्तरावर गेले आहेत. त्यांना जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, कोणी त्यांना विचारत नाही. त्यामुळे केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि बातम्यांमध्ये येण्यासाठी अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

इतक्या खालच्या थराला जाणारे राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. इतने निम्न स्तर तक गिरने वाली राजनीति पहली बार देखने को मिल रही है। ( मुंबई | 04-08-2026)#Maharashtra #Mumbai pic.twitter.com/D5Zjzlhwbk — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 4, 2026


पुढे बोलताना त्यांनी “बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ” या म्हणीचा उल्लेख करत काँग्रेसच्या रणनीतीवर टीका केली. “सध्या त्यांची राजकीय भूमिका केवळ वादात राहण्यापुरतीच उरली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत इतक्या खालच्या पातळीवरील भाषा यापूर्वी क्वचितच पाहायला मिळाली आहे,” असेही ते म्हणाले.

‘गुंगी गुडिया’ वादावर हर्षवर्धन सपकाळांचे स्पष्टीकरण; टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांना दिला मोलाचा सल्ला

महायुती आक्रमक; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र

सुनेत्रा पवार यांच्यावरील या टिप्पणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सह महायुतीतील सर्वच घटकपक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. या प्रकरणामुळे येत्या दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

हर्षवर्धन सपकाळ भूमिकेवर ठाम?

माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात असलेल्या नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असते. त्यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, एका नेत्याने पत्रकारांना गप्प बसण्यास सांगितले, मात्र त्या वेळी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही,” असा आरोप केला. त्यांच्या मते, त्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वापरलेला “गुंगी गुडिया” हा शब्दप्रयोग करण्यात आला असून तो वैयक्तिक टीका नसून त्यांच्या भूमिकेचे वर्णन असल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांनी पुढे म्हटले की, “सुनेत्रा पवार विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगतात. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील प्रकरण, अर्थ खात्याचा मुद्दा तसेच इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही. संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा विषयांवर स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित असते.”

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

Web Title: Fadnavis lashes out at congress over gungi gudiya jibe at sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadanvis
  • Congress
  • Maharashtra Political
  • Nationalist Congress Party
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
2

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
4

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.