Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

Sangli District Central Cooperative Bank elections: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, स्वतंत्र पॅनेल उभारायचे की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, याबाबत चर्चा सुरू आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 08:07 PM
Sangli District Central Cooperative Bank elections

Sangli District Central Cooperative Bank elections

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या
  • भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा
  • सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनेल उभारायचे की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, याबाबत महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या समन्वयाची जबाबदारी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांची जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बांधणी तसेच विविध मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजपने आतापासूनच मतदारसंघनिहाय बांधणी सुरू केली आहे. विकास सेवा संस्था गटासह अन्य महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. संभाव्य उमेदवारांची चाचपणी, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि मतदारसंघनिहाय संघटनात्मक ताकद यांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे.भाजपच्या बैठकीत स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या दिशेने भूमिका स्पष्ट झाली असली, तरी महायुतीतील घटक पक्षांशी चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुढे कोणते राजकीय समीकरण आकाराला येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा

भाजपकडून जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनेल उभारण्याची तयारी असली, तरी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निवडणुकीचे अंतिम स्वरूप निश्चित केले जाणार आहे. जागावाटप, मतदारसंघनिहाय उमेदवार आणि पॅनेलची रचना याबाबत या चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे पॅनेल उभारणार की महायुतीच्या माध्यमातून मैदानात उतरणार, याकडे आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधताना स्थानिक पातळीवरील नेते आणि इच्छुक उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सम्राट महाडिकांवर समन्वयाची जबाबदारी

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सम्राट महाडिक यांच्यावर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील राजकीय समीकरणे, संभाव्य उमेदवार आणि महायुतीतील घटक पक्षांशी संवाद या पातळ्यांवर समन्वय साधण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, राहुल महाडिक, चिमण डांगे, संग्रामसिंह देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होनमोरे, अमरसिंह देशमुख, वैभव पाटील तसेच भाजप नेते शेखर इनामदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

२१ जागांसाठी २,४४५ मतदार

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून अंतिम मतदार यादीत २ हजार ४४५ मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय गटांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने आगामी काळात पॅनेल निर्मिती आणि जागावाटपाच्या चर्चांना वेग येणार आहे.

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

Web Title: Sangli district bank election bjp mahayuti samrat mahadik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • BJP
  • elections
  • Sangli District Bank

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
2

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
3

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग
4

PDCC Bank Election : पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत ठरावांचा धुरळा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही जोरदार फिल्डिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.