Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता; सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या

सर्व निकाल घोषित झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत हे मतमोजणीच्या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बार्शीकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मोठा आहे. शहर आणि तालुका विकासाला भुकेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 09, 2025 | 11:42 AM
बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता

बार्शी बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाची निर्विवाद सत्ता

Follow Us
Close
Follow Us:

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने निर्विवादपणे जिंकली आहे. राऊत यांच्या गटाने विरोधी गटाचा १८-० अशा फरकाने धुव्वा उडवला. आमदार दिलीप सोपल गटाला एकही जागा मिळवता आली नाही. माजी सभापती रणवीर राऊत या मतमोजणी केंद्रात सकाळपासून ते तळ ठोकून होते.

सहकारी संस्था सुरेश गुंड ८१५, बाबा गायकवाड ७९०, विजय गरड ८०४, अभिजीत कापसे ७९८, प्रभाकर डमरे ८१८, रविकांत साळुंखे ७९१, यशवंत माने ८१३, महिला राखीव गटात मनीषा ताकभाते ८५०, सुमन पाटील ८४४, इतर मागासवर्ग संजय कुमार माळी तर विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये रामेश्वर पाटील ८२९, ग्रामपंचायत मतदारसंघात नेताजी घायतिडक ६३२, अजित बारंगुळे ६२६ यांना मते मिळाली तर अनुसूचित जाती जमाती या गटात सतीश (पप्पू) हनुमंते यांना ६२० मते तर आर्थिक दुर्बल घटक गटात सचिन बुरगुटे ६२१ आणि हमाल तोलार गजेंद्र मुकटे ७२७ मते मिळाली आहेत.

दरम्यान, सर्व निकाल घोषित झाल्यानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत हे मतमोजणीच्या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बार्शीकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मोठा आहे. शहर आणि तालुका विकासाला भुकेला आहे. म्हणून यापुढे ही फक्त विकासासाठीच काम करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

कराडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पक्षबदल केले जात आहेत. असे असताना आता तासवडे विकास सेवा सोसायटीचे पॅनल प्रमुख संजय जाधव यांच्यासह चेअरमन आणि सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश उंब्रज गटातील आमदार मनोज घोरपडे यांची राजकीय ताकद अधिक दृढ करणारा ठरला आहे.

हेदेखील वाचा : सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी लोटला जनसागर; विविध पक्ष संघटना व संस्थांच्या वतीने अभिवादन

Web Title: Former mla rajendra raut group has undisputed power over the barshi market committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee
  • political news
  • Solapur News

संबंधित बातम्या

“चित्रपटांपेक्षा माणसांची ‘होप’ बनण्यातच खरे समाधान”- सोनू सूद; मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक
1

“चित्रपटांपेक्षा माणसांची ‘होप’ बनण्यातच खरे समाधान”- सोनू सूद; मोहोळ तालुक्यातील मसलेचौधरी गाव दत्तक

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल
2

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले
3

भाजप संघटनेत मोठे फेरबदल; पंजाब, हरियाणासह ‘या’ चार राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान
4

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.