Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Gen Zच्या वाढत्या प्रभावाची दखल घेत आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटानेही तरुणांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी Gen Zसोबत युवा संवाद साधणार असून युवकांच्या समस्या आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 08:18 PM
Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे Gen Zसोबत संवाद साधणार
  • युवकांच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्यावर भर
  • Gen Zच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय पक्षांचा तरुण मतदारांकडे वाढता कल
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या Gen Z आणि युवा मतदारांकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या ‘क्रॉकोच जनता पार्टी’च्या आंदोलनांनंतर तरुणांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले आहे. आता सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गटानेही Gen Zसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता युवकांसोबत युवा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात तरुणांच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.

राहुल गांधी, फडणवीसांनंतर श्रीकांत शिंदेंचा युवा संवाद

यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात Gen Zसोबत संवाद साधला होता. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही तरुणांशी संवाद साधला. त्यामुळे Gen Zच्या प्रश्नांवर राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा वाढताना दिसत आहे.

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवकांच्या बदलत्या अपेक्षा आणि त्यांच्यासमोरील आव्हाने समजून घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.

Gen Zच्या ताकदीची राजकीय दखल

‘क्रॉकोच जनता पार्टी’च्या आंदोलनांमुळे तरुण पिढीच्या प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. नीट परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली.

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ‘छात्रों की गुंज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. कोटा, प्रयागराज आणि पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांना तरुणांचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

त्यामुळे आगामी काळात Gen Zचा आवाज, त्यांचे प्रश्न आणि त्यांची राजकीय भूमिका हा महत्त्वाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांकडून तरुणांशी थेट संवाद साधण्याचे वाढते प्रयत्न हे त्याचेच संकेत मानले जात आहेत.

Web Title: Gen z shrikant shinde yuva samvad maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Gen Z
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
1

Rohit Pawar on Nagpur Event:’ भाजपकडून राहुल गांधींच्या कार्यक्रमाची कॉपी!; रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
2

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
3

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
4

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.