Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांना उद्देशून केलेल्या मिश्कील वक्तव्याने कार्यक्रमात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

  • By विवेक
Updated On: Aug 28, 2026 | 05:17 PM
गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला

Follow Us
Follow Us:
  • गिरीश महाजनांनी छगन भुजबळांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने कार्यक्रमात हशा
  • ‘माझ्या कामाकडे बघा, माझ्याकडे बघू नका’ असं म्हणत महाजनांचा मिश्कील टोला
  • मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकच्या कृषी क्षेत्राचे आणि मविप्र संस्थेच्या योगदानाचे केले कौतुक
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मिश्कील वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी मविप्र संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेने शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून लाखो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद असले तरी निवडणुका झाल्यानंतर सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही महाजन म्हणाले. याचदरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्याकडे मिश्कीलपणे मोर्चा वळवला.

‘माझ्या कामाकडे बघा, माझ्याकडे बघू नका’

महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करतील. ‘मी पालकमंत्री म्हणून काम करतोय. तुम्ही माझ्या कामाकडे बघा. माझ्याकडे बघू नका, बरं का भुजबळ साहेब…’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी टाळ्यांचाही कडकडाट झाला.

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

यानंतर महाजन यांनी, ‘मला माहिती नाही यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही. नाहीतर ते मला टोमणा मारतील,’ असेही मिश्कीलपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण काही काळ हलकेफुलके झाले. दरम्यान, आगामी नाशिक कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा विषय नसून सर्वांचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.

फडणवीसांकडून मविप्र संस्थेचे कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविप्र संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वावर संस्थेचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या योगदानाचा गौरव केला. दोन लाखांहून अधिक विद्यार्थी आणि दोन हजारांहून अधिक शिक्षक असलेली ही संस्था राज्यातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असल्याचे फडणवीस म्हणाले. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते, असा उल्लेखही त्यांनी केला.

मराठा आरक्षणावर जरांगे पुन्हा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार? प्रसाद लाड यांनी दिली मोठी माहिती

कांद्याच्या भावावर फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

शेतीच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांद्याच्या दराचाही उल्लेख केला. ‘आमच्या डोळ्यांत वर्षातून दोनदा कांदा पाणी आणतो,’ अशी मिश्कील टिप्पणी करत सध्या कांद्याला चांगला भाव असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी मोठ्या मेहनतीने उत्पादन घेतो, मात्र उत्पादन खर्च वाढत आहे आणि हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांसह अनेक आव्हाने शेती क्षेत्रासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Girish mahajan chhagan bhujbal nashik statement fadnavis agriculture college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • CM Devendra Fadnavis
  • girish mahajan

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!
1

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!
2

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत 3 मोठे निर्णय, आता सरकारी भूखंडाचे नियम बदलणार… शेतकऱ्यांसाठीदेखील घेतला मोठा निर्णय!

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
3

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
4

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.