Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला अन् राहुल नार्वेकर…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सडकून टीका

विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 04, 2026 | 11:09 AM
'निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला अन् राहुल नार्वेकर...'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सडकून टीका

'निवडणूक आयोग भाजपच्या दावणीला बांधलेला अन् राहुल नार्वेकर...'; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोग प्रामाणिक नाही हे दिसत आहे. आयोगाने जनाची नाही तर मनाची तरी बाळगून आतापर्यंत गुन्हा दाखल करायला हवा होता, पण आयोग हा भाजपच्या दावणीला बांधलेला आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, राज्यपाल यांनी अराजकीय भूमिका घ्यायची असते, ते एका अत्यंत महत्वाच्या संवैधानिक पदावर असतात. पण नार्वेकर हे गुंड, मवाल्यासारखे वागले, विरोधी पक्षाच्या व्यक्तीला दमदाटी केली. त्यांची देहबोली, वर्तन व दमदाटी ही अत्यंत खालच्या पातळीवरची होती, ही शोकांतिका आहे. कुटुंबातील व्यक्ती बिनविरोध निवडून यावेत यासाठी ते निवडणूक निर्णय होते.

हेदेखील वाचा : ‘मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० हजार कोटी रुपायांच्या भ्रष्टाचारावरच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेतील लोक भ्रष्ट आहेत. त्यामुळे कोणीच कोणावर कारवाई करू शकत नाही आणि सत्तेतून बाहेरही पडत नाहीत. पण अजित पवार यांनी मात्र नरेंद्र मोदी व फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे, असेही सपकाळ म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

नार्वेकर स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले

अधिकाऱ्यांचा दरवाजा अडवून थांबले होते, विरोधकांना अर्ज भरू न देणे हे त्यांचे वर्तन अशोभनीय असून त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत, त्यांना धमकावणे, त्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश देणे हा काय प्रकार आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ते आदेश देतात, नार्वेकर स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजायला लागले आहेत. निवडून आल्यानंतर घोडेबाजार होतो हे पाहिले, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Harshvardhan sapkal criticizes the election commission and rahul narwekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Election Commission
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • Rahul Narwekar

संबंधित बातम्या

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन
1

Cockroach Janta Party Account Ban: कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?
2

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

Maharashtra Breaking News Updates Today:  ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयकडून अटक
3

Maharashtra Breaking News Updates Today: ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयकडून अटक

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?
4

NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.