फोटो सौजन्य सोशल मिडिया
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे माजी मंत्री व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाले असून अकांऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजशी माझा काही संबंध नाही असे स्पष्ट मत काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे. एक्स अकांऊट हॅक झाल्याने कोणीही याचा गैर फायदा घेऊ शकते, एक्स अंकाऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजवर आणि लिंक वर क्लिक करु नये. विजय वडेट्टिवार यांचे सोशल मिडिया वर असंख्या फाॅलोअर्स आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार नेहमी एक्स अकांऊटवर आपली प्रतिक्रिया नोंदवत असतात.
काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी एक्स अकांऊट हॅक झाल्या नंतर इनस्टाग्राम अकांऊट व्दारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार आपल्या इनस्टाग्राम पोस्ट मध्ये स्पष्ट म्हणाले की, सध्या माझ्या अकाउंटवरून होणाऱ्या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कुठल्याही कृतीशी माझा कोणताही संबंध नाही. असे मत काॅग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाल्या नंतर अकांऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजशी माझा काही संबंध नाही. एक्स अकांऊट हॅक झाल्याने याचा कोणीही गैर फायदा घेऊ शकते. माझ्या एक्स अंकाऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजवर आणि लिंक वर कोणीही क्लिक करु नये, त्यावर विश्वास आणि प्रतिक्रिया देऊ नये.
काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
अकाऊंट सुरक्षितपणे पुन्हा माझ्या ताब्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार म्हणाले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाल्याने, विजय वडेट्टीवार यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवहान केले आहे. एक्स अकाऊंट पुन्हा व्यवस्थित रित्या रिकव्हर होत नाही, तो पर्यंत होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. असे मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे.






