Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीवर टीका करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संविधान वाचवण्याचे आवाहन केले. पणजीतील कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Sep 07, 2026 | 07:06 PM
हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • ‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’, हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल
  • ‘संविधान वाचले तर देश वाचेल’, संविधान बचावाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन
  • माणिकराव ठाकरे आणि गिरीश चोडणकर यांचीही भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर टीका
 

पणजी : देशातील संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीवर जोरदार टीका करत, ‘फॅसिस्ट विचार देशासाठी आणि जगासाठी घातक आहेत. या विचारांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे,’ असं म्हटलं आहे.

भाजपा आणि आरएसएसकडून संविधान संपवण्याचा प्रयत्न

पणजी येथे ऑल इंडिया कौमी तंजीमच्या वतीने आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात सपकाळ बोलत होते. देशात दोन वेगवेगळे विचारप्रवाह असल्याचं सांगत त्यांनी एका विचारप्रवाहाला सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा संविधानाचा विचार, तर दुसऱ्या विचाराला मनुस्मृतीला मानणारा विचार म्हणून संबोधलं.

भाजपा आणि आरएसएसकडून संविधान संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. ‘संविधान वाचले तर देश वाचेल, त्यामुळे संविधान वाचवण्याच्या लढ्यात सहभागी व्हा,’ असं आवाहन त्यांनी केलं.

Operation Tiger 4: ठाकरे गटात भूकंप? ‘ १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा

सपकाळ यांनी आरएसएसच्या विचारसरणीवरही टीका केली. संविधानाला अभिप्रेत असलेला देश भाजपा आणि आरएसएसला नको असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची नोंदणी करून संविधान स्वीकारावं, असं आवाहन त्यांनी केलं.

माणिकराव ठाकरे, गिरीश चोडणकरही आक्रमक

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी संविधान आणि काँग्रेसचा विचार एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं सांगितलं. संविधानाने सर्व जाती-धर्मांना समान अधिकार दिले आहेत आणि त्याचं रक्षण करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचं ते म्हणाले. संविधान कोणत्याही परिस्थितीत बदलू दिलं जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Rahul Gandhi News: विद्यार्थी भाजपवर नाराज; महाराष्ट्रातील परीक्षा आंदोलनावर राहुल गांधींचा इशारा

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राहुल गांधी यांच्या संविधान बचाव अभियानाचा उल्लेख करत भाजपा आणि आरएसएसवर टीका केली. संविधान निर्मितीपासूनच आरएसएसने त्याला विरोध केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आरएसएसने तिरंगा ध्वजालाही विरोध केल्याचं चोडणकर म्हणाले.

या कार्यक्रमाला गोवा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार तसेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पणजीतील या कार्यक्रमातून काँग्रेसने संविधान आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात आपली भूमिका आणखी आक्रमकपणे मांडल्याचं पाहायला मिळालं.

Web Title: Harshwardhan sapkale constitution save programme bjp rss congress goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • RSS

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
1

Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन
2

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
3

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
4

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.