"देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, शेतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, शेतकरी संकटात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका तरूण शेतकऱ्याने त्याचे २० एकर सोयाबीन मोडीत काढण्याचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांनाही आपल्या शेताची अवस्था पाहण्यास या, अशी आर्त विनंती केली होती पण कोणीही या शेतकऱ्याकडे फिरकले नाही.
महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे, बुलढाणा जिल्ह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला फक्त ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सरकारचे दावे व वस्तुस्थिती यात मोठा फरक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे पण शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये, आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी केल्या जातील. एल निनोच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत झालेली अल्पवृष्टी लक्षात घेता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नेहमीव शेतकरी बांधवांना प्राथमिकता दिली असून, हे शासन खऱ्या अर्थाने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्णारे सरकार आहे.
– प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी नेते
शेतक-यांना तातडीची मदत, पीक नुकसानीचे पंचनामे, पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता या मुद्द्यांवर विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काजू-बदामाच्या बैठकीपासून सुरू झालेला वाद येत्या आठवड्यात दुष्काळाच्या व्यापक प्रश्नावरून सरकारविरोधातील राजकीय हल्ल्यात रूपांतरित होती का, याकडे लक्ष लागले आहे.
पंचनाम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात प्राथमिक आढावा आणि पंचनाम्यांच्या आधारे शेतक-यांना तातडीने मदत देण्याची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी स्थितीचे पंचनाम्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.






