Jalgaon train accident dcm Ajit Pawar explanied entire incident
पुणे : जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. यामध्ये 13 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे ही घटना घडली असून याबाबत संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडले. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रवाशांची थेट नावे देखील घेतली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जळगावमध्ये नेमका अपघात कसा झाला याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी प्रवाशांची नावे घेऊन तपशीलवार माहिती दिली आहे. ‘एका चहा विक्रेत्याने रेल्वेतील एका डब्यात आग लागल्याची ओरड केली. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या मारल्या. मात्र, ही घटना फक्त आणि फक्त अफवांमुळे घडली’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “जळगावमध्ये रेल्वे अपघाताची घटना घडल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थाळी पोहोचून मदतकार्य केलं. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, रेल्वेच्या एका डब्यातील रसोईतील एका चहा विक्रेत्याने डब्यात आग लागली म्हणून आरडाओरड केली. आग लागली या भीतीने त्या पूर्ण डब्यात गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातही मोठा गोंधळ निर्माण झाला, तेव्हा काही प्रवाशांनी घाबरून स्वत:चा जीव वाचावा म्हणून रेल्वेतून खाली उड्या मारल्या”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, “तसेच रेल्वे वेगाने असल्यामुळे काही प्रवाशांना उतरता आलं नाही. त्यामुळे कोणीतरी रेल्वेची साखळी ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली आणि प्रवाशी खाली उतरले. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या शेजारच्या रेल्वे ट्रॅकवरून कर्नाटक एक्स्प्रेस अतिशय वेगाने आली आणि रुळावरील प्रवाशांना चिरडलं. त्यानंतर ती गाडी पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. या घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १० लोकांची ओळख पटलेली आहे. अद्याप तीन लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच ही घटना निव्वळ अफवांमुळे घडलेली आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांनी प्रवाशांची थेट नावे देखील घेतली आहे. “उदल कुमार हा 30 वर्षांचा उत्तर प्रदेशातील श्रीवस्ती जिल्ह्यात राहणारा युवक पुष्पक एक्सप्रेसने 21 जानेवारीला 9.25 ला लखनऊवरुन मुंबईला येण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत पत्नीचा भाऊ विजय कुमार होता. दोघे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत येत होते. सर्वसाधारण तिकीटावर ते प्रवास करत होते. सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर ते बसले होते. रेल्वे रसोई यान बोगीतील चहा विक्रेत्याने आग लागली, आग लागली अशी ओरड केली. त्या ओराळ्या उदल आणि विजय दोघांना ऐकू आल्या. ते ऐकू आल्यानंतर बोगीमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून दोन्ही बाजूंना उड्या मारल्या,” अशी थेट नावं अजित पवार यांनी घेऊन जळगाव रेल्वे अपघाताचे पूर्ण कारण सांगितले आहे.