File Photo : CM Devendra Fadnavis
दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात सुमारे 3 लाख 5 हजार कोटी रुपयांचा बुधवारी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. या गुंतवणुकीच्या माध्यमातून रिलायन्सचे अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जा, किरकोळ विक्री, आतिथ्य आणि उच्च तंत्रज्ञान, उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये तीन लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रासाठी एक अभूतपूर्व क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेदेखील वाचा : Jalgaon Railway Accident : ‘घटना अतिशय वेदनादायी’; जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
अनंत अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल कौतुक केले. रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध आहे. भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने योगदान आणि महाराष्ट्राला पहिली ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे अनंत अंबानी यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या या ऐतिहासिक गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनंत अंबानी यांचे आभार मानले.
ह्युंदाई मोटर्ससोबत महत्वपूर्ण बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष इल बम किम यांच्याशी बुधवारी दावोसमध्ये एक अभ्यासपूर्ण बैठक घेतली. या चर्चेत ह्युंदाईने भारतासाठी उत्पादने कस्टमायझ करण्यावर भर दिला आहे. या ऑक्टोबरपासून मेड इन महाराष्ट्र कार लाँच करण्याच्या त्यांच्या योजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्र्यांनी ह्युंदाईच्या यशस्वी आयपीओचे अभिनंदन केले. पुण्यात त्यांच्या नवीन प्लांटच्या स्थापनेचे स्वागत केले. किम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत अर्थपूर्ण सीएसआर उपक्रमांमध्ये सहकार्य करण्यास उत्सुकता दर्शविली, ज्यामुळे राज्यासोबतच्या भागीदारीत आणखी एक मैलाचा दगड ठरेल.
हेदेखील वाचा : Anjali Damania : अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?