Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : “फडणवीसांना CM पदावरुन काढून टाकण्यासाठी अघोरी पूजा? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा

अशोक खरातने मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जावे यासाठी प्रयत्न केले असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासाठी आमदारांनी करंगळी कापली असल्याचा दावा केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 25, 2026 | 04:44 PM
Jitendra Awhad claims Ashok Kharat Aghori Puja against Devendra Fadnavis for CM post

Jitendra Awhad claims Ashok Kharat Aghori Puja against Devendra Fadnavis for CM post

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातकडून अनेक मंत्र्यांनी करुन घेतली अघोरी पूजा
  • देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरुन काढून टाकण्यासाठी भोंदूबाबाचे प्रयत्न
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा
Jitendra Awhad : मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजते आहे. त्याचे रोज नवे काळे कारनामे समोर येत आहेत. अंधश्रद्धेचा वापर करुन आणि धमकी देऊन त्याने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अघोरी विद्या, अंधश्रद्धेतून पूजा, नरबळी आणि असे अनेक प्रकार समोर आले आहेत. यानंतर आता त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

भोंदूबाबा अशोक खरात बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सगळा खुलासा केला आहे. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये या भोंदूबाबाने एका पत्रकाराला जीवे मारले असल्याचे देखील सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “या खरातला वाचवण्यासाठी 2007 साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही याबाबत लेख छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घ्यायचे,” असा दावा त्यांनी केला.

हे देखील वाचा : अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करुन अघोरी पूजा केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, “खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’ असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे देखील वाचा : अंकातून भविष्य मांडणार भोंदूबाबा गणितात फेल; अशोक खरात 10 वी नापास

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अशा काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे 38 आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे,” अशा शब्दांत पुरोगामी महाराष्ट्रातील सत्यस्थिती जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये मांडली.

Web Title: Jitendra awhad claims ashok kharat aghori puja against devendra fadnavis for cm post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • devendra fadnavis
  • Jitendra Awhad

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
2

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
3

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या
4

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अन्… ; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे ९ प्रमुख मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.