Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (दि ६) शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 08:30 PM
Maharashtra Politics: राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
Follow Us
Follow Us:

बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध नाहीच 
करुणा मुंडे यांनी देखील भरला उमेदवारी अर्ज 
23 एप्रिलला मतदान तर 4 मे ला निकाल जाहीर होणार

बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले.

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (दि ६) शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून माजी आमदार ॲड विजयराव मोरे यांचे चिरंजीव ॲड आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान करुणा मुंडे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीच्या आज झालेल्या मेळाव्यात सर्वच वरिष्ठ नेत्यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत बिनविरोध निवडणूक न झाल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar PC: दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

“दादां शब्दांला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षीला ठेवूनच शब्द देते, पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे, सर्व बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. कुटुबाच्या विकासासाठी मी झटत राहिल हा माझाही शब्द आहे.’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करायचे आहे. यापूर्वी बारामतीत आज राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

Baramati News : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला निशाणा

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ” दादांच्या अचानक जाण्याचे  अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचलं पण काळजी करू  नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा जनता दरबार यापुढेही सुरू राहिलं. त्यांच्या जाण्याचे अस्वस्थतेचं वातावरण होतं. आजही तसेच वातावरण   आहे. व्यापारी, शेतकरी, कामगार महिला. तरूण, सगळेच हवालदिल झाले  होतं आपण आजही मी ठामपणे सांगते, बारामतीचा विकास तितक्याच वेगाने सुरू राहिल. बाजारपेठेतील  उलाढाल गतीमान राहण्यासाठी  नवीन   प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत  येण्यासाठी  मी सर्व पातळीवर लक्ष देईन.  दादांचा प्रशासनावर  आदरयुतक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामे वेळेत होत होती. ती शिस्त यापुढेही कायम राहिल, प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची काम वेळेत होतील याची खात्री बाळगा.”

Web Title: Karuna munde fill form baramati by election against sunetra pawar maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • karuna munde
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
1

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
2

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
3

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.