Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॉकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

दिल्लीतील जंतर-मंतरवरील अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका केली. 'कॉकरोच जनता पार्टीत उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी सुरू आहे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 05:44 PM
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल
  • ‘कॉकरोच जनता पार्टीत विलीन होणार का?’ असा खोचक सवाल
  • जंतर-मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र
 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात   कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत.  येत्या २० जुलैला अभिजीत दिपकेंच्या नेतृत्त्वात संसदेवर मोर्चा काढला जाणार आहे. दिपकेंच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना? असा खोचक सवाल उपस्थित केला.

Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी २० जुलैच्या संसदेवरील मोर्चाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

काय म्हणाले केशव उपाध्ये ?

आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून उपाध्ये म्हणाले, “क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद पूर्णपणे पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडला, अचानक स्थापन झालेल्या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना?”

“नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र नेहमीप्रमाणे ठोस भूमिका किंवा स्पष्ट दिशा न देता हवेत गोळीबार, ढोंगी हिंदुत्वाचा आव, इतरांना उपदेश आणि संभ्रम निर्माण करणारी विधाने एवढाच तिचा गाभा होता. आंदोलनाला पाठिंबा देतानाच देशातील तरुणांनाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.”

‘क्रोकरोच पार्टी’त विलीन
होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे?
उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद पूर्णपणे पाहिली आणि ऐकली. ती पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडला, अचानक स्थापन झालेल्या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’मध्ये उबाठा गट विलीन होण्याची मानसिक तयारी तर सुरू नाही ना? नवी दिल्लीतील… pic.twitter.com/ldZuKj4UNz — Keshav Upadhye (@keshavupadhye) July 13, 2026

‘मोदी सरकारवर टीका करणे हीच पहिली अट’

उपाध्ये यांनी पुढे टीका करत म्हटले की, “या कथित ‘क्रोकरोच जनता पार्टी’च्या सदस्यत्वासाठी जर काही निकष असतील, तर ते पूर्ण करण्यात उबाठा गटाला कोणतीच अडचण येणार नाही. पहिली अट म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात सातत्याने अवमानकारक भाषा वापरणे. हे तर उबाठा गटाचे रोजचे कामच झाले आहे. दुसरी अट म्हणजे दिशाहीन बडबड आणि केवळ आव्हानांची भाषा “हिम्मत असेल तर…” अशा प्रकारची वक्तव्ये. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी वास्तवाच्या कसोटीवर अपयशी ठरूनही ही शैली मात्र कायम आहे.”

“श्रीमंत उद्धवपंतांची पत्रकार परिषद म्हणजे मोदीजींनी काय करावे, हिंदूंनी काय करावे, महिलांनी काय करावे, तरुणांनी काय करावे, शेतकऱ्यांनी काय करावे याचा सल्लागार वर्गच असतो. स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र मौन आणि इतरांनीच सर्व काही करावे, असा त्यातून संदेश दिला जातो.”

’26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही’; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

राहुल गांधींनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर आणखी टीका करत म्हटले की, “यावेळी त्यात आणखी एक भर पडली. राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी “मोलाची सूचना”ही त्यांनी केली. म्हणजे इतरांनी रस्त्यावर उतरावे, पण आपण मात्र ‘मातोश्री’च्या बाहेर पडणार नाही, एवढेच त्यांना बहुधा सांगायचे असावे.”

Web Title: Keshav upadhye slams uddhav thackeray over cockroach janata party support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
1

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव
2

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात; सदा सरवणकरांची आयुक्तांकडे धाव

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
3

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.