
महायुतीवर विक्रांत जाधव यांचे टीकास्त्र
खेडमध्ये चुरशीची निवडणूक निश्चित
त्रिकोणी समीकरणाला धक्का बसल्याच्या चर्चा
खेड: राज्यातील नगरपरिषद निवडणुका जवळ येत असताना कोकणातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल झाली आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचे अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्यक्ष महाविकास आघाडी शी हातमिळवणी केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले. नुकतेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खेडमध्ये पार पडले. या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या संयुक्त छायाचित्रांनी सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टरमुळे खेडपासून संपूर्ण कोकणात ‘नवे राजकीय समीकरण’ सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
त्रिकोणी समीकरणाला धक्का बसल्याच्या चर्चा
या निवडणुकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यानं महायुतीत आधीपासूनच तणाव होता. राष्ट्रवादीच्या हालचालीमुळे महायुतीच्या भाजपा-शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी या त्रिकोणी समीकरणाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते.
विक्रांत महायुतीवर जाधव यांचे टीकास्त्र
उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या उद्धव बाळासाहेब ठाक गटाचे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांन महायुतीवर जोरदार टीका केली ‘भाजपा आणि शिंदे गटाच्या वाढत्या अहंकारामुळे जनता पर्याय शोधू लागल आहे. महायुतीने लोकांच्या भावना दुर्लक्ष् केल्या व त्याचे पडसाद आता उमटव आहेत’, अशी टीका त्यांनी केली. जाधव पुढे म्हणाले, ‘ही निवडणूक कोकणातील राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल लोक महायुतीला योग्य धडा शिकवतील याची आम्हाला खात्री आहे.’
खेडमध्ये चुरशीची निवडणूक निश्चित
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महा विकास आघाडी प्रवेशामुळे खेडची लढत अधिक चुरशीची आहे. आतापर्यंत महायुतीविरुद्ध एकत्र उभा आता राष्ट्रवादीच्या ताकदीच्या भरामुळे समा पूर्णपणे बदलणार आहेत. कोकण निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांचा प्रभाव मह मानला जातो. अशा वेळी राष्ट्रवादीची हालचाल कुटुंबाच्या राजकीय बळावर परिणाम क असल्याचे जाणकार सांगतात. या घडामोडीमु नगरपरिषद निवडणूक स्थानिक पातळीवर मया राहता कोकणातील व्यापक राजकीय संघर्षा बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न असा की मह गाठ अधिक सैल होणार का? की महा विकास बळ आणखी वाढणार? कोकणातील सर्वांचे लक खेडकडे लागून राहणार आहे.
खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला
निवडणूकीचे वारे वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तारूढ महायुतीतील घटकपक्ष — शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — यांनी खेड नगर परिषद निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, महाविकास आघाडीच्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी व घटक पक्षांची देखील आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी येथे नगराध्यक्षपदासाठी मात्र मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.