Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विदर्भ-मराठवाडा दौऱ्यावर टीका करत हा दौरा मतदारांची माफी मागण्यासाठी नसून आदित्य ठाकरे यांचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी असल्याचा आरोप केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 27, 2026 | 04:30 PM
'आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

'आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

Follow Us
Follow Us:
  • मतदारांची नाही, मुलाचे करिअर वाचवण्यासाठीच दौरा
  • उद्धव ठाकरेंवर किरण पावसकर यांची टीका
  • ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’
मुंबई : शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदार संघात जाऊन मतदारांची माफी मागण्यासाठी उबाठा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले आहेत, मात्र मतदारांची माफी मागण्याचा हा दौरा नसून मुलाचे करियर वाचवण्यासाठीचा दौरा असल्याची खरमरीत टीका शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पावसकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विदर्भात गेले आहेत, मात्र नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत उबाठा नेतृत्व बांद्रा बाहेर पडले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडले होते. उबाठाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या मतदार संघात जाऊन आज मतदारांनी माफी मागण्याचा उबाठाचा प्रयत्न आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीच दौरा का केला नाही, असा प्रश्न तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख उबाठाला विचारतील. मतदारांची माफी नाही तर मुलाची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी उबाठा दौरा करत आहेत, अशी टीका पावसकर यांनी केली.

Aditya Thackeray: पत्रकारांना धमकावणाऱ्या संजय दिना पाटलांवर आदित्य ठाकरे कडाडले; म्हणाले, ‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन्…’

पावसकर पुढे म्हणाले की, वरळीसारख्या सुरक्षित मतदार संघातून मुलाला निवडून आणण्यासाठी उबाठाला दोन आमदारांचा पत्ता कापावा लागला. आमदार सुनील शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेवर उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे लागले. त्यामुळे आताही मुलाच्या करियरसाठी उबाठा विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत, असे पावसकर म्हणाले. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ६५ नगरसेवक शिवसेनेत आले. उबाठातून ४० आमदार शिवसेनेत गेले त्याचे ६० आमदार झाले. आज सहा खासदार गेले उद्या त्याचे १२ होतील, असे पावसकर म्हणाले.

आमदार फोडले, खासदार फोडले, नगर सेवक फोडले या आरोपांना काही महत्व उरलेले नाही. हे सर्व लोकप्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी शिवसेनेत का प्रवेश करतात, याचे आत्मपरिक्षण उबाठाने करायला हवे. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, याच कारण शिंदे यांचे नेतृत्व तळागाळातून जाऊन काम करतेय, घरात बसून काम करत नाही, असा टोला पावसकर यांनी लगावला. भविष्यातील पक्ष प्रवेशांबाबत लवकरच मोठी बातमी कळेल, असे पावसकर म्हणाले.

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

Web Title: Kiran pawaskar criticises uddhav thackeray vidarbha marathwada tour over aditya thackeray political career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
1

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
2

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
3

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी घेतले राणेंचे नाव, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख
4

Disha Salian case: दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टात घमासान; राजकीय हेतूचा आरोप अन् नारायण राणेंचा उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.