Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवरून उबाठावर टीका केली. शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीसह मराठा आरक्षणावरही शिंदेंनी भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 09:14 PM
'बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,' एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

'बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,' एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर शिंदेंची भूमिका
  • सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो प्रोटोकॉलनुसार : शिंदे
  • मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक, जरांगेंना आवाहन
 

Eknath Shinde : बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरु आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यघटना, पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे अधिकार या सगळ्या बाबी आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरु झाला की त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिल्लीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून त्यात संघटनात्मक चर्चा होईल, असे ते म्हणाले.

Maratha Reservation: सोलापुरात जयकुमार गोरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; जरांगेंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैवतासमान आदर केला. पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित केली.शिवरायांशी केलेली तुलना पंतप्रधानांनासुद्धा आवडणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिष्टाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात, असे ते म्हणाले.

मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आयोगाची स्थापना, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज अशा अनेक योजना मुख्यमंत्री असताना घेतल्या, आताही इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. जे कायदेशीर आणि न्याय्य आहे ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना केले.

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Web Title: Eknath shinde criticizes ubt over bow and arrow symbol shiv sena supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
2

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.