Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर…’ राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया

शिवसेना (UBT) मधील राजकीय घडामोडींवर बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. "राऊतांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य ठरणार नाही," असे ते म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Jun 18, 2026 | 05:43 PM
'संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर...' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया

'संजय राऊत शिवीगाळ करत असतील तर...' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून किरेन रिजिजूंची मोठी प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांनी फुटीर खासदारांवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात
  • केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे संजय राऊतांवर भाष्य
  • प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी आणि स्वतःच्या पद्धतीने काम करत असतो – किरेन रिजिजू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दुसऱ्यांदा पक्षफुटी झाली असून शिवसेना शिंदेगटाच्या ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या पक्षफुटीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अश्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून संताप व्यक्त करत फुटीर खासदारांवर शिवीगाळ करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून त्यांना आता इतर राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अश्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास आधी नकार दिला. राऊत सातत्याने पक्षातील बंडखोरीवर टीका करत असताना त्यावर भाष्य करण्यास रिजिजू यांनी सुरुवातीला टाळले. “संजय राऊत एखाद्यावर टीका करत असतील किंवा शिवीगाळ करत असतील, तर त्याला उत्तर देणं योग्य ठरणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

काय म्हणाले किरेन रिजिजू?

माध्यमांशी संवाद साधताना किरेन रिजिजू म्हणाले की, “संसदेत काय घडतं हे सर्वांसमोर आहे आणि त्याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही. प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी आणि स्वतःच्या पद्धतीने काम करत असतो. प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यपद्धती वेगळी असते. त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्या खासदाराने काय करावं किंवा करू नये, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “संसदेत मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर सर्व पक्षांच्या खासदारांचे सहकार्य अपेक्षित असते. मात्र संजय राऊत एखाद्यावर टीका करत असतील किंवा शिवीगाळ करत असतील, तर त्याला उत्तर देणं योग्य ठरणार नाही.”

शिवसेना (UBT) मधील राजकीय घडामोडी आणि त्यावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर किरेन रिजिजू यांनी घेतलेली सावध भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण

संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

संजय राऊत यांनी काल (बुधवार, 17 जुन) खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाझे यांनी पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊतांनी या खासदारानावर वादग्रस्त विधाने करत शिवीगाळदेखील केली. आजदेखील पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.

Web Title: Kiren rijiju reacts on sanjay raut comments shiv sena ubt crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Kiren Rijiju
  • Operation Tiger
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
2

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.