Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah Speaks Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अमित शाह उत्तर देणार; किरेन रिजिजूंचे विरोधकांना प्रत्युत्तर

विद्यार्थी आंदोलन आणि सर्व संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. मी विरोधी पक्षांना विनंती करतो की, सरकार विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यास तयार असल्याने, तुम्ही चर्चेदरम्यान कोणताही गोंधळ घालणार नाही

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 04:11 PM
Parliament, Monsoon Session, Delhi Police, Student Protest, National News, Breaking News

Parliament, Monsoon Session, Delhi Police, Student Protest, National News, Breaking News

Follow Us
Follow Us:
  • गृहमंत्री संसद परिसरात उपस्थित; योग्य वेळी सभागृहात उत्तर देणार
  • आंदोलनावर संपूर्ण चर्चेसाठी सरकार तयार; विरोधकांनी गदारोळ थांबवावा.
  • विरोधकांमुळे कामकाज ठप्प; शांततेचे आश्वासन मिळाल्यास चर्चा शक्य.
 

Amit Shah Speaks Student Protest:  दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलिसी कारवाई आणि लाठीचार्जबाबत विरोधी पक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. गेल्या १३- १४ दिवसांपासून अमित शाह सभागृहात न आल्याने विरोधी इंडिया आघाडी सातत्याने अमित शाहांवर टिका करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांवरील हिंसक कारवाई आणि लाठीचार्जच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे नाही, म्हणून अमित शाह सभागृहात येण्याचे टाळत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. पण आता अमित शहा सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सभागृहात येणार असल्याची माहिती मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे.

मात्र, शाह कधी बोलणार आहेत याबद्दल रिजिजू यांनी कोणतीही माहिती दिली नाही. २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईबाबत गृहमंत्री यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्ष करत आहे. शाह यांनी संसद परिसराला नियमित भेट दिली आहे, परंतु ते सभागृहात दिसले नाहीत.

ED Director Rahul Navin Extension News: ईडी संचालक राहुल नवीन यांना एक वर्षाची मुदतवाढ; ऑगस्ट २०२७ पर्यंत सांभाळणार जबाबदारी

२० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू असून ते १३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या तीन आठवड्यांत सततच्या गदारोळामुळे सभागृह वारंवार तहकूब करण्यात आले आहे. कागदगळती प्रतिबंधक विधेयकावरील चर्चेव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू सोमवारी म्हणाले, “विद्यार्थी आंदोलन आणि सर्व संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे सरकारने अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. मी विरोधी पक्षांना विनंती करतो की, सरकार विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यास तयार असल्याने, तुम्ही चर्चेदरम्यान कोणताही गोंधळ घालणार नाही आणि गृहमंत्री व सरकारचे उत्तर पूर्णपणे शांततेने ऐकाल, असे आश्वासनही त्यांना द्यावे लागेल.”

आज सकाळी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांनी सभागृहात निवेदन द्यावे अशी मागणी केली. ते म्हणाले, “लोकसभा आणि राज्यसभेत आमची एकच मागणी आहे की अमित शाह यांनी सभागृहात येऊन आपले विचार मांडावेत. मुलांवर झालेल्या अन्यायावर त्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, यासाठी आम्ही गेल्या १७ दिवसांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या शेवटच्या आठव

पावसाळी अधिवेशनाचे केवळ चार कामकाजाचे दिवस शिल्लक आहेत, परंतु संसदेतील सध्याच्या कोंडीमुळे महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि परकीय योगदान (नियमन) कायदा (FCRA) यांसारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर अजूनही अनिश्चितता आहे. यापैकी कोणतेही विधेयक सोमवारी लोकसभेच्या अजेंड्यात समाविष्ट नाही.

सरकार कोंडी सोडवण्याचा प्रयत्न

संसदेतील सध्याच्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर, सरकार विरोधी पक्षांशी सातत्याने चर्चा करत आहे. गेल्या आठवड्यात, सरकारने महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांसाठी विरोधी पक्ष आणि मित्रपक्ष या दोघांकडूनही पाठिंबा मिळवण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. हा तिढा सोडवण्याच्या प्रयत्नात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दोनदा भेट घेतली. त्यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरही संवाद साधला.

 

Web Title: Kiren rijiju says amit shah will respond to delhi student protest in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Delhi Police
  • Monsoon Session
  • national news
  • Student Protest

संबंधित बातम्या

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!
1

ECI Clarification On SIR : निवडणूक आयोगात मतभेद? ‘SIR’ प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे स्पष्टीकरण!

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.