Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी; आघाडी तुटली, काँग्रेस आता स्वबळावर

गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. राज्य सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 21, 2025 | 08:03 AM
आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी तुटली; काँग्रेस स्वबळावर

आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी तुटली; काँग्रेस स्वबळावर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी ही घोषणा केली. मुंबई काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर चेन्नीथला म्हणाले, ‘आम्ही महाविकास आघाडीसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की, नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात. त्यामुळे काँग्रेस बीएमसी निवडणुका स्वबळावर लढणार आहे’.

गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. राज्य सरकारला निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. कारण त्यांना महानगरपालिकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवायचे होते. परिणामी, बीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महायुती लोकांच्या समस्यांकडे लक्ष न देता हिंदू-मुस्लिम संघर्ष भडकवून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपाचा अजेंडा आहे. काँग्रेस संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाईल, असे चेन्निथला यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Maharashtra Local Body Election 2025 : निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लागले लक्ष

तसेच महापालिका निवडणुकीसाठी लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. जर काँग्रेस बीएमसीमध्ये सत्तेत आली तर मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईतील लोकांना संघर्ष नको तर विकास हवा आहे. आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाऊ, असेही म्हटले आहे.

युतीतील मतभेदही उघड

एकीकडे राज्यात आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत असताना, युतीमध्ये देखील सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. मुंबईत भाजपकडून गरजेनुसार युतीची घोषणा केली गेली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात देखील भाजपाने काहीसे नमते घेत ठाणे जिल्ह्यात देखील युतीसाठी बैठकांना सुरुवात झाली आहे. मात्र, नवी मुंबईत गणेश नाईक मात्र स्वबळावर लढण्यासाठी ठाम असून, माजी खा. संजीव नाईक यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे स्वबळाचा पुनरुच्चार केल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेकडून युतीचा पुनरुच्चार केला जात असला तरी मिळालेल्या माहितीनुसार खुद्द एकनाथ शिंदे देखील स्वबळाचा प्रयोग करण्याची शक्यता वाढली आहे.

Web Title: Maha vikas aghadi alliance has broken congress will now contest on its own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:03 AM

Topics:  

  • Congress Politics
  • maharashtra news
  • Mumbai News
  • political news

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
1

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
2

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु
3

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
4

Thane : वाढती महागाई, इंधन दरवाढविरोधात जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.