Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार’; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे 'गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन' सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 08:23 AM
महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे विधान

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या 17 जागा लढवणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे विधान

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार, महायुतीकडून जागावाटप झाले आहे. या जागावाटपानंतर शिवसेनेच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. महाविकास आघाडी सर्व १७ जागा लढवणार आहे. दोन दिवसात या संदर्भात पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

दरम्यान, सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, ‘पैसा फेक तमाशा देख’चा दुसरा अंक सुरु झाला असून, ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे ‘गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीने मोठे आंदोलन केले, तीन तास रास्ता रोको करण्यात आला. भाजप-महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची एकजूट व ताकदी पाहून फडणवीस सरकार हादरले म्हणूनच बुधवारी तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे. पण या बैठकीतून रिकाम्या हाताने परत येऊ नका, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

दुसरीकडे, राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या या जागावाटपात अखेर भाजप सर्वाधिक १२ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ४ आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला १ जागा मिळणार आहे.

Web Title: Maha vikas aghadi to contest 17 legislative council seats says congress state president harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Legislative Council Election
  • political news

संबंधित बातम्या

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
1

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
2

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी
3

अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेच्या मासिक सभेत राडा; नगरसेवकासह काही जण जखमी

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
4

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.