Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra By-election 2026 : बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान अन् निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी महाराष्ट्रामध्ये देखील पोटनिवडणूक जाहीर केली. बारामती आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 05:22 PM
पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणूक जाहीर
  • बारामती आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर
  • 23 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी निकाल
 

Maharashtra By-election 2026 : पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यामध्ये देशातील पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या राज्यांच्या समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (election commission of india) मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. (Maharashtra Politics)

 

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

#WATCH | Delhi: Chief Election Commissioner Gyanesh Kumar says, “Bye-Elections will be held on 8 Assembly Constituencies in Goa, Gujarat, Karnataka, Maharashtra, Nagaland and Tripura. The schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura… pic.twitter.com/EZ34G1ftfV — ANI (@ANI) March 15, 2026


मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 23 एप्रिल 2026 रोजी पोट निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल तर येत्या 4 मे रोजी पोटनिवडणूकीचा निकाल हाती येणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. ही पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे कोणताही नेता वारल्यानंतर त्याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जात नाही.

हे देखील वाचा : Baramati By Election 2026 : बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार? पोटनिवडणूक बिनविरोध होणार की लढणार?

महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती पुढे चालवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गट कोणताही उमेदवार देणार नाही अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शरद पवार गट हा बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार देणार नसल्याचे देखील समोर आले आहे.

देशातील पाच राज्याचे ‘सरकार’ बदलणार?

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

प्रमुख राज्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • पश्चिम बंगाल: यावेळेस बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त असेल. येथे दोन टप्प्यांत मतदान होईल. पहिला टप्पा 23 एप्रिल आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • तामिळनाडू: राज्यात एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • आसाम: आसाममध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • केरळ: केरळमध्येही 9 एप्रिल रोजी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
  • पद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच दिवशी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.
 

हे देखील वाचा :  देशातील पाच राज्यांचे ‘सरकार’ बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; कधी अन् किती टप्प्यांत होणार मतदान?

Web Title: Maharashtra by elections 2026 for baramati and rahuri constituencies voting on april 23 results may 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • byelection
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.