Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra By-election : महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक! निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये अजित पवारांनंतर बारामतीसाठी आणि शिवाजी कर्डिले यांच्यानंतर राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 03:21 PM
Maharashtra Bypolls 2026 Baramati By-election after Ajit Pawar death Rahuri By-election Shivaji Kardile death

Maharashtra Bypolls 2026 Baramati By-election after Ajit Pawar death Rahuri By-election Shivaji Kardile death

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता
  • बारामती मतदारसंघ आणि राहुरी मतदारसंघासाठी निवडणूक
  • बिनविरोध निवडणूक होण्यासाठी महायुतीचे प्रयत्न
Maharashtra By-election : मुंबई : आज सायंकाळी चार वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) पत्रकार परिषद होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याच पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी (Maharashtra Politics) देखील ही पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे.

महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बारामती विधानसभा आणि राहुल विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा

बारामती मतदारसंघ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघाती निधन झाले. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवारांनंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला होता. अजित पवारांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत चर्चांना पूर्णविराम लावला. याचबरोबर राज्यसभेमध्ये पार्थ पवार यांना संधी देण्यात आली आहे. आता बारामतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार किंवा जय पवार यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.

राहुरी मतदारसंघ 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. या जागेवर भाजपचे कर्डिले कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तनपुरे कुटुंब यांच्यात बऱ्याच काळापासून स्पर्धा आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी, पाथर्डीचा मोठा भाग आणि अहिल्यानगरमधील काही गावे यासह तीन तालुके आहेत. पोटनिवडणुकीपूर्वी मतदारांची संख्याही वाढली आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये नेत्याच्या निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून उमेदवार न दिली जाण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव ? आमदार सुनील शेळकेंची विधीमंडळात मागणी

बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्यास बिनविरोध करण्याकडे लक्ष असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

 

Web Title: Maharashtra bypolls 2026 baramati by election after ajit pawar death rahuri by election shivaji kardile death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • byelection
  • Election Commission

संबंधित बातम्या

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
1

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
2

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद; कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा, सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
3

Supreme Court SIR Hearing: पश्चिम बंगाल SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

Pune SIR Voter List News: दुबार मतदारांवर चालणार ‘SIR’ची कात्री!; एकाच ठिकाणी नाव राहणार, २४ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी
4

Pune SIR Voter List News: दुबार मतदारांवर चालणार ‘SIR’ची कात्री!; एकाच ठिकाणी नाव राहणार, २४ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.