Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs for Ex Agniveer: माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवेत १ हजार पदांना मंजुरी!

Jobs for Ex Agniveers: माजी अग्निवीरांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये १ हजार अधिसंख्य पदे (Supernumerary Posts) निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने (GAD) शासन निर्णय जारी केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 29, 2026 | 04:54 PM
Maharashtra Govt News, Ex Agniveers Jobs

Maharashtra Govt News, Ex Agniveers Jobs

Follow Us
Follow Us:
  • सेवामुक्त अग्निवीरांसाठी महाराष्ट्रात १ हजार अधिसंख्य पदांच्या निर्मितीला शासन मंजुरी
  • भरतीची कार्यपद्धती ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • पोलीस, वनरक्षक, कारागृह रक्षक व अग्निशमन दलात मिळणार नोकरीच्या संधी
Maharashtra Govt Job Approval For Ex Agniveers:  सैन्यदलातील चार वर्षांची सेवा पूर्ण करून सेवामुक्त होणाऱ्या माजी अग्निवीरांना महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय सेवेत पुनर्नियुक्ती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांसाठी विविध विभागांमध्ये १ हजार अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे.

या पदांवर नियुक्तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत गृह, वन, सामान्य प्रशासन, वित्त, नगरविकास तसेच विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी सदस्य असतील. माजी अग्निवीरांना प्रामुख्याने गृह विभागातील पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई, कारागृह पोलिस/रक्षक, अग्निशामक व बचावकर्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान व वाहनचालक, वन विभागातील वनरक्षक तसेच महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील अग्निशामक-विमोचक पदांवर संधी देण्याचा विचार करण्यात आला आहे.

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

सरकारचा सेवामुक्त अग्निवीरांसाठी निर्णय

अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण कैल्यानंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्यांच्या आधारे २५ टक्के अग्निवीरांना सैन्यदलात कायमस्वरूपी नियुक्ती मिळते, तर उर्वरित ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होतात. या सेवामुक्त अग्निवीरांचे प्रशिक्षण, कौशल्ये आणि शारीरिक क्षमता यांचा शासकीय सेवेत उपयोग करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

समितीची जबाबदारी काय?

उच्चस्तरीय समिती माजी अग्निवीरांसाठी विभाग आणि संवर्गनिहाय अधिसंख्य पदे निश्चित करणार आहे. तसेच या पदावर नियुक्तीची कार्यपद्धती ठरवून, नियुक्त झालेल्या माजी अग्निवीरांना पुढे नियमित शासकीय किंवा निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कार्यपद्धती सुचवणार आहे.

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा

चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सेवामुक्त होणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या विविध शासकीय विभागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्यांच्या आधारे २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्यदलात संधी मिळते, तर उर्वरित ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होतात. या सेवामुक्त अग्निवीरांच्या कौशल्यांचा शासकीय सेवेत उपयोग करून घेण्यासाठी विविध पदांवर संधी देण्याचा विचार करण्यात येत आहे.

 पोलिस दलासह ‘या’ विभागांत संधी

गृह विभागांतर्गत पोलिस शिपाई, चालक पोलिस शिपाई, राज्य पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दलातील पदांचा संभाव्य संवर्गात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा आणि नागरी संरक्षण संचालनालयातील अग्निशामक व बचावकर्ता पदांचाही विचार केला जाणार आहे.

तसेच वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या महापालिका व नगरपालिकांमधील अग्निशमन आणि विमोचक पदांवर सेवामुक्त अग्निवीरांना संधी देण्याबाबतही विचार सुरू आहे.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

सेवामुक्त अग्निवीरांच्या नियुक्तीसाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव राहणार आहेत. गृह, वन, सेवा, वित्त आणि नगरविकास विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी समितीचे सदस्य असतील. माजी सैनिक कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

Web Title: Maharashtra newsmaharashtra govt approves 1000 supernumerary posts for ex agniveers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • government jobs
  • Maharashtra Govt

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.