Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील प्रारुप मतदारयादीवरून राजकीय वाद पेटला आहे. बीडमधील 250 BLA यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत भाजपवर गंभीर टीका केली.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 04:25 PM
मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Follow Us
Follow Us:
  • बीडमधील 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला
  • ‘महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक मतदार गायब’, ठाकरेंचा दावा
  • मतदारयादीच्या मुद्द्यावर भाजपवर उद्धव ठाकरेंचा निशाणा
 

Uddhav Thackeray : महाराष्ट्रात मतदारयादीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून नवीन प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघातील तब्बल 250 बीएलए अर्थात बूथ लेव्हल एजंट्सनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी बीडमधून आलेल्या बीएलएंचं कौतुक केलं. कार्यकर्ता केवळ पक्षासाठी नाही, तर जनतेसाठी मैदानात उतरतो, असं सांगत त्यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करूनही ते संघटनेचं काम करत असतात, असं ठाकरे म्हणाले.

‘बीड पुन्हा भगवा करण्याची संधी’

बीडमधील पक्षाच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी जुन्या युतीचा संदर्भ दिला. युतीच्या राजकारणामुळे बीडमधील काही जागा मित्रपक्षाला सोडत गेल्याने शिवसेनेचं या भागातील अस्तित्व कमी होत गेलं, असा दावा त्यांनी केला.

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

“आता पुन्हा एकदा बीड भगवा करण्याची संधी आली आहे,” असं म्हणत ठाकरेंनी आगामी राजकीय लढाईचे संकेत दिले. पक्षाच्या नावाबाबतही त्यांनी भाष्य करत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव नोंदणीकृत असल्याचं सांगितलं.

मतदारयादीवरून भाजपवर निशाणा

मात्र या भेटीनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती मतदारयादीवरून केलेल्या आरोपांची. बीएलएंची जबाबदारी आगामी काळात अत्यंत महत्त्वाची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मतदारयादी तपासण्याचं आणि मतदारांची नावे व्यवस्थित आहेत की नाही, हे पाहण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

यावेळी ठाकरेंनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. “भाजप खालच्या पातळीवर जाऊन डावपेच करते आणि त्यानंतर निवडणुका जिंकते,” असा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदारांची नावे गाळल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्रातील मतदारयादीकडेही लक्ष वेधलं. “महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक मतदार गायब आहेत. तुमच्या लक्षात येतंय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, मतदारयादीतील नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात बीएलएंची भूमिका, मतदारयादीची पडताळणी आणि वगळण्यात आलेल्या नावांचा मुद्दा राजकीयदृष्ट्या आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra voter list row 250 bla meet uddhav thackeray beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Beed News
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray
  • Voter List

संबंधित बातम्या

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
1

लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
4

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.