महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन
परांजपे म्हणाले की, विधान परिषद निवडणूक निकालानंतर मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी शिवसेना नेत्यांबाबत बोलताना जी भाषा वापरली ती महायुतीमध्ये योग्य नाही. आजची भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषदेतील भाषा अयोग्य होती, मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळायला हवी. प्रत्येकाने मर्यादा आणि संयम पाळला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्याला दिलेल्या पदापेक्षा जास्त मर्यादा ओलांडून कोणीही शिवसेनेवर टीका करण्याचा प्रयत्न करु नये, असे परांजपे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यातील बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबत चर्चा होईल, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना व प्रवक्त्यांना मित्र पक्षांवर टीका करु नये तसेच दोस्तीत कुस्ती नको, असे आदेश दिले आहेत. महायुतीत शिवसेना नेत्यांकडून मित्र पक्षांच्या नेत्यांवर टीका होणार नाही, अशीच अपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करतो, असे ते म्हणाले.
आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा परांजपे यांनी निषेध केला. कुठल्याही लोकप्रतिनिधीने अशी असंवेदनशील वक्तव्य करु नयेत, असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे संकेत मुख्य नेते शिंदे यांनी दिल्याचे परांजपे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक संकटात सर्वात प्रथम जाणारा पक्ष शिवसेना आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सर्वात आधी धावून जाते, असे परांजपे म्हणाले. केवळ महाराष्ट्रच नाही तर केरळचा महापूर, जम्मू काश्मिरमधील अतिवृष्टी, नेपाळमधील अडकेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेना धावून गेली होती, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ते म्हणाले.
परांजपे म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला होता. पक्षाकडून ४ लाख ६० हजार दिवाळीचा शिधा १८० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकरी बांधवांकडे पोहोचला, असल्याची माहिती परांजपे यांनी दिली. महाराष्ट्रातील माता भगिनींना २५ हजार शिलाई मशीनचे वाटप, मुलींना २५ हजार सायकलचे वाटप शिवसेनेकडून केले जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह जमले आहेत, त्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शिवसेनेकडून विवाह केले जाणार आहेत. शिवसेना बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.
पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला
Ans: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.
Ans: महायुतीतील तिन्ही पक्षांमधील समन्वयाच्या मुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
Ans: आनंद परांजपे हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.






