न्यूझीलंडकडून भारताचा दणदणीत पराभव (फोटो- सोशल मिडिया)
भारताची फलंदाजी
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी केली. या सामन्यात भारताची सुरुवात चांगली राहिली नाही. संजू सॅमसन केवळ 4 रन्सची खेळी करून तर इशान किशन शून्यावर आउट झाला. वैभव सूर्यवंशी मागील सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला होता. तरी देखील आज त्याला वगळून इशान किशनला संधी देण्यात आली. मात्र किशन शून्यावर आउट झाला. तिलक वर्मा 35 रन्सची खेळी करून आउट झाला.
IND vs NZ ODI: भारताला मोठा झटका, प्रसिद्ध कृष्णा सिरीजमधून बाहेर
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. त्याने 22 रन्सची आक्रमक खेळी केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो आउट झाला. अभिषेक शर्मा देखील 15 बॉलमध्ये 27 रन्स करून आउट झाला. अक्षर पटेल देखील 7 रन्सची खेळी करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी देखील 21 रन्स करून आउट झाला. नमन धीर 28 रन्सची आक्रमक खेळी करून आउट झाला. अर्शदीप सिंग शून्यावर आउट झाला.
टीम सेफर्ट आणि फिन अॅलेनने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. मयंक यादवने आपल्या पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर सेफर्टला बाद भारताला पहिले यश मिळवून दिले. सेफर्टने ५ चेंडूंमध्ये ३ धावा करुन स्वस्तात बाद झाला . त्यानंतर, मयंक यादवने आपल्या वेगाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. त्याने एक अचूक यॉर्कर टाकून डॅरिल मिचेलला पायचीत (LBW) केले. मिचेलने रिव्ह्यू घेतला, पण चेंडू थेट त्याच्या बॅकफूटला लागल्याने पंचांचा निर्णय कायम राहिला. मिचेलने अवघ्या ९ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.
Ans: चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 260 रन्सचे टार्गेट दिले होते.
Ans: सिरीजमधील चिउठया सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला आहे.






