Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वरवर महायुतीचा झेंडा! १४ पैकी १० जागा जिंकत पंचायत समितीवर मिळवली सत्ता

तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 10, 2026 | 10:38 AM
Sangmeshwar Panchayat Samiti 2026:

Sangmeshwar Panchayat Samiti 2026:

Follow Us
Follow Us:
  • संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची सत्ता
  • तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी
  • तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी
Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला असून तालुक्यातील पंचायत समितीवर महायुतीची सत्ता आली आहे. १४ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप- २, शिवसेना शिंदे गट-४ व राष्ट्रवादी अजित पवार गट- ४ उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीवर सत्ता येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विजयाचा गुलाल उधळला. तर तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही तालुक्यात महायुतीने बाजी मारली आहे.

पंचायत समिती निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- महेश जड्यार (भाजप), आरवली- प्रिया सुवरे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- अपर्णा जाधव (शिवसेना ठाकरे गट), धामणी- दत्ताराम लाखण (शिवसेना ठाकरे गट), कसबा- सुरेश माईन (शिवसेना शिंदे गट), परचुरी- शर्वरी वेल्ये (शिवसेना शिंदे गट), माभळे- सुहास मायगडे (शिवसेना शिंदे गट), मुचरी- आरूषी घवाळी (राष्ट्रवादी अजित पवार गट), कोसुंब- दुर्वा पाष्टे (भाजप), निवेबुद्रुक- प्रफुल्ल बाईत (राष्ट्रवादी अजित पवार गट), साडवली- क्षमा जाधव (शिवसेना ठाकरे गट), हातीव- मंगेश बांडागळे (राष्ट्रवादी अजित पवार गट),दाभोळे- दिपाली जाधव (शिवसेना शिंदे गट), कोंडगाव- विद्यासागर तांदळे (शिवसेना ठाकरे गट) हे विजयी झाले आहेत.

तालुक्यातील ७ पैकी ४ जि. प. गटांवर शिवसेना शिंदे गट-भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जि. प. निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. यामध्ये जि. प. निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर- सुशिल भायजे (राष्ट्रवादी अजित पवार गट), कडवई- संतोष थेराडे (शिवसेना ठाकरे गट), कसबा- विशाखा कुवळेकर (शिवसेना ठाकरे गट), मुचरी- माधवी गीते (शिवसेना शिंदे गट), कोसुंब-प्रमोद अधटराव (भाजप), साडवली- नेहा माने (शिवसेना ठाकरे गट), दाभोळे- विलास चाळके (शिवसेना शिंदे गट) हे उमेदवार विजयी झाले आहेत. जि. प. निवडणुकीत कोसुंब जि. प. गटात सर्वात हायहोल्टेज लढत झाली. याचे कारण या गटातून भाजपकडून प्रमोद अधटराव व शिवसेना शिंदे गटातून रोहन बने निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या गटात महायुतीमध्येच ही खऱ्याअर्थाने लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या प्रमोद अधटराव यांनी रोहन बने यांचा पराभव केला.

Stock Market Today: गुंतवणूकदारांना आज कोणते शेअर्स देतील बंपर नफा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

कसबा जि. प. गटातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवला. उबाठा शिवसेनेच्या उमेदवार म्हणून त्यांनी पारंपरिक शिंदे सेनेला मोठा धक्का देत अनेक वर्षांपासून असलेली एकहाती सत्ता मोडीत काढली. नवख्या उमेदवाराने मिळवलेल्या या दणदणीत यशामुळे कसबा गटाच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाल्याचे चित्र आहे. विजय घोषित झाल्यानंतर सौ. कुवळेकर यांनी मतदार बांधव भगिनींचे आभार मानले. निवडणूक काळात दिलेले प्रत्येक आश्वासन सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करून दाखवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकासकामांना प्राधान्य देत काम करताना कोणत्याही परिस्थितीत राजकारण केले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या विजयामुळे कसबा गटात नव्या नेतृत्वाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

साडवली जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाच्या नेहा माने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या रूपाली कदम यांचा पराभव केला. रूपाली कदम या प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. कडवई जि. प. गटातून शिवसेना ठाकरे गटाचे संतोष थेराडे यांनी भाजपचे विनोद म्हस्के यांचा पराभव केला. या गटात कुणबी फँक्टर चालल्याचे बोलले जात आहे. मुचरी जि. प. गटात अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे सेनेच्या माधवी गिते यांनी विजय मिळवला आहे. या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या माधवी गिते या पूर्वी शिवसेना एकसंघ असताना कार्यरत होत्या.

T20 World Cup 2026 : India vs Pakistan सामन्याबाबत पाकिस्तानने का केलं सरेंडर

शिवसेना फुटीनंतर त्या शिंदे सेनेत गेल्या होत्या. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून ललिता तांबे या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच या दोघींमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण चांगलेच तापले होते. अखेर निकालाच्या दिवशी माधवी गिते यांनी बाजी मारली. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. धामापूर तर्फे संगमेश्वर जि. प. गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवखे उमेदवार सुशिल भायजे यांनी मातब्बर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या सहदेव बेटकर यांचा दारूण पराभव केला. दाभोळे जि. प. गटातून शिवसेना शिंदे गटाचे विलास चाळके यांनी दणदणीत विजय मिळवला. ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांनी वंचितच्या विरश्री बेटकर यांचा पराभव केला.

 

 

Web Title: Mahayutis flag flies over sangameshwar it won 10 out of 14 seats and gained power in the panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Election
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
3

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.