Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतानांचा फोटो; दादा भुसे म्हणाले, ‘फोटो असेल तर काढायला लावणार’

मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनात टिपू सुलतानांचा फोटो पुन्हा झळकला आहे. यावरून राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली असून दादा भुसे यांनी फोटो काढण्याची सूचना देणार असल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 09:52 PM
शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे

शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे

Follow Us
Follow Us:
  • मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा टिपू सुलतानांचा फोटो.
  • उपमहापौर शान-ए-हिंद यांच्याकडून फोटो लावण्याच्या निर्णयाचे समर्थन.
  • दादा भुसे म्हणाले, ‘फोटो असेल तर काढायला लावणार’.
मालेगाव : नाव आणि फोटोवरून राज्याच्या राजकारणात अनेकदा वाद निर्माण होताना दिसतात. आता मालेगाव महापालिकेत पुन्हा टिपू सुलतान यांच्या फोटोवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या नूतनीकरण केलेल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला आहे.

उपमहापौरांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत टिपू सुलतान यांचाही फोटो असल्याचे दिसून आले. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो लावणार असल्याचे शान-ए-हिंद यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.

‘देशासाठी बलिदान दिल्याने फोटो लावला’

नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केल्यानंतर शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यामागील भूमिका स्पष्ट केली. टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

मात्र, यापूर्वीही मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा हा फोटो झळकल्याने विरोधी पक्षातील सदस्य आणि इतर राजकीय नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

‘फोटो असेल तर काढायला लावणार’ – दादा भुसे

या वादावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. मालेगाव महापालिकेच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला आहे की नाही, याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो लावण्यात आला असल्याचे स्पष्ट झाल्यास तो काढण्याच्या सूचना दिल्या जातील, असे भुसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे या मुद्द्यावरून मालेगावमध्ये पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

दरम्यान, दादा भुसे यांनी शाळा आणि खासगी क्लासेसच्या विषयावरही पत्रकार परिषदेत माहिती दिली. शाळा किंवा महाविद्यालय आणि खासगी क्लासेसमध्ये असे टायअप असल्याचे आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच खासगी क्लासेसकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही सभागृहात निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Malegaon municipal corporation tipu sultan photo controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • dada bhuse
  • Malegaon
  • Nashik News

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
1

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर प्रतिसाद; मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट
2

‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला राज्यभर प्रतिसाद; मंत्री दादाजी भुसे यांची कोकणातील शाळांना भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.