Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ५८ लाख कुणबी नोंदींच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. सरकारकडून चर्चेसाठी अधिकृत संपर्क झालेला नसल्याचे सांगत जरांगे यांनी मराठा बांधवांना आगामी मुंबई आंदोलनासाठी तयारी करण्याचे आवाहन केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 12:42 PM
‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, '१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा...' मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, '१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा...' मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Follow Us
Follow Us:
  • मराठा आंदोलकांना मनोज जरांगेंचा ‘गनिमी कावा’चा आदेश
  • उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंचे भावनिक आवाहन
  • मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून यावेळी त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. आमरण उपोषणाचा आज (३१ ऑगस्ट 2026) तिसरा दिवस असून ५८ लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र उपोषण सुरू झाल्यानंतरही सरकारकडून चर्चेसाठी कोणताही अधिकृत संपर्क झालेला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

‘गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा’

सोमवारी आंदोलकांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आगामी मुंबई आंदोलनाबाबत नवी रणनीती मांडली. मराठा बांधवांनी वाहनांवर झेंडे न लावता मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईत नातेवाईक, मित्र किंवा परिचितांकडे मुक्काम करावा आणि सध्या आझाद मैदान किंवा ‘वर्षा’ निवासस्थानाच्या दिशेने जाऊ नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

आंदोलनादरम्यान पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. अंतरवाली सराटीतील गर्दी काही प्रमाणात कमी झाली तरी मुंबईतील उपस्थिती वाढवण्यावर भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

१२ सप्टेंबरपर्यंत सरकारला अल्टीमेटम

रविवारी आंदोलकांना संबोधित करताना जरांगे यांनी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला. या मुदतीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन मुंबईतील आंदोलनाची अंतिम तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील आंदोलन पाच टप्प्यांत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने मोटारसायकलींसह आंदोलनासाठी तयारी करण्याचे आवाहन करताना संपूर्ण आंदोलन शांततेत झाले पाहिजे आणि कोणत्याही ठिकाणी जाळपोळ किंवा हिंसाचार होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी समर्थकांना दिले.

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’

उपोषणाबाबत जरांगे यांनी अत्यंत भावनिक भूमिका मांडली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगत, उपोषणादरम्यान आपला मृत्यू झाला तरी मृतदेह मुंबईला घेऊन जावा, असे त्यांनी समर्थकांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले.

आता १२ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, चर्चेची प्रक्रिया सुरू होते का आणि प्रस्तावित मुंबई आंदोलनाबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

Web Title: Manoj jarange patil maratha reservation hunger strike third day mumbai protest strategy september 12 ultimatum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
1

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल
2

Mumbai Navratri 2026: मुंबईत सर्वात मोठा गरबा महोत्सव; रंगणार ‘रंगीलो रे’चा जल्लोष, नवरात्रीचा उत्साह होणार डबल

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
3

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका
4

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.