Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर आणि संविधानिक मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 30, 2026 | 04:06 PM
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आमरण उपोषण सुरू.
  • मागण्या मान्य न झाल्यास 12 सप्टेंबरनंतर मुंबईकडे येण्याचा इशारा.
  • मुख्यमंत्री फडणवीसांकडून चर्चेची दारे खुली; शिंदेंच्या परभणी दौऱ्याला जरांगेंचा विरोध.
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवार, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून राज्यातील विविध भागांतून मराठा समाजाचे बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल होत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे जाण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. सरकारला 12 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मुदत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर फडणवीसांची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते आंदोलकांशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही चर्चेतून मार्ग काढण्यात आला असून यापुढेही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच कायद्याच्या चौकटीत, संविधानाशी सुसंगत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन न करणाऱ्या मागण्यांवर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत असून पुढील एक-दोन दिवसांत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंच्या परभणी दौऱ्याला जरांगेंचा विरोध

परभणीतील खासदार बंडू जाधव यांच्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला आहे. शिंदे यांनी परभणीत येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली.

या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हा कार्यक्रम मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचे शिंदे यांनी सांगितल्याचा निरोप कडू यांनी जरांगेंना दिला.

Maratha Reservation : ‘मुंबईच नाही, दिल्लीही हलवू शकतो’; जरांगेंचा सरकारला इशारा, 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

फडणवीसांवरही जरांगेंचा हल्लाबोल

अंतरवाली सराटीत बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. फडणवीस यांचे “100 टक्के दिवस भरले आहेत”, असा दावा करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

त्याचवेळी परभणीतील परिस्थितीवरूनही जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेतून पुढील काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Manoj jarange patil maratha reservation fadnavis eknath shinde parbhani protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
1

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
2

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
3

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!
4

Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.