Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

Manoj Jarange Patil ; अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जरांगेंची लवकरच भेट घेणार असून पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले.

  • By विवेक
Updated On: Aug 30, 2026 | 08:30 PM
उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह

उदय सामंतांचा मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचा आग्रह

Follow Us
Follow Us:
  • उदय सामंत उद्या किंवा परवा मनोज जरांगेंची भेट घेणार.
  • ‘पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, सामंतांचा दावा.
  • शिंदे-फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर करण्याचं जरांगेंना आवाहन.
 

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, राज्य सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी लवकरच प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे.

उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार, ते उद्या किंवा परवा अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्या मार्गी लावण्यासाठी आपण जरांगेंच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला.

शिंदे-फडणवीसांबाबत गैरसमज दूर करण्याचं आवाहन

मनोज जरांगे पाटील आणि आपले राजकीय संबंधांपलीकडचे संबंध असल्याचं सांगत उदय सामंत यांनी त्यांना एक विनंती केली. कोणत्याही गैरसमजातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कठोर वक्तव्य करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं सांगत, गैरसमज दूर करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं.

परभणीतील मेळावा जरांगेंना काउंटर करण्यासाठी नव्हता

परभणीतील शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्यावरूनही सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता, असं त्यांनी सांगितलं.

हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आला होता. सात जुलै रोजी कार्यक्रम होणार होता; मात्र शिंदे आजारी असल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे या मेळाव्याचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी थेट संबंध जोडणं चुकीचं असल्याचं सामंत म्हणाले.

मराठा समाजाला कमी लेखण्यासाठी किंवा आरक्षणाच्या मागणीवर संभ्रम निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?

‘शिंदे जरांगेंच्या प्रकृतीची काळजी घेतात’

उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादाचाही उल्लेख केला. आंदोलन आणि मागण्यांबाबत चर्चा होत राहील, मात्र मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी, अशी शिंदेंची भूमिका असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत, असा विश्वास जरांगे पाटील यांनी ठेवावा, असंही सामंत म्हणाले. आता उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यात होणारी संभाव्य भेट आणि त्यातून सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Uday samant manoj jarange patil maratha reservation meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
1

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात
2

Ratnagiri: हापूस आंब्याला मिळणार नवी ओळख! निवेंडी मॅंगो पार्कसाठी भूसंपादन वेगात

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
4

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.