Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘58 लाख नोंदी सापडल्या तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाही?’; मंत्र्यांसमोर मनोज जरांगेंचा संताप

29 ऑगस्टपासून उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यावेळी कुणबी प्रमाणपत्र, 58 लाख नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी संताप व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 06:03 PM
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Follow Us
Follow Us:
  • 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम.
  • 58 लाख नोंदी सापडल्या असतील तर कुणबी प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? असा सवाल.
  • कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप करत सरकारसमोर जरांगेंनी संताप व्यक्त केला.
 

राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याची भूमिका घेतली असून, त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी सरकारकडून शिष्टमंडळ पाठवण्यात आले. मात्र, चर्चेदरम्यान कुणबी प्रमाणपत्र आणि जुन्या नोंदींच्या मुद्द्यावरून जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई आणि उदय सामंत, तसेच आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात चर्चा झाली.

शिंदे समितीने तब्बल 58 लाख नोंदी शोधल्या असल्याचा दावा केला जात असेल, तर संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण काय, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण कधी मिळणार, अशी विचारणाही त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींसमोर केली.

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप

काही मराठा समाजातील व्यक्तींना यापूर्वी देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केला. या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. या मुद्द्यावरून त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावरही आरोप केले.

‘मराठ्यांना प्रमाणपत्र देणार नसाल तर स्पष्ट सांगा; आम्ही आरक्षणाची मागणीच करणार नाही,’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. ओबीसी प्रमाणपत्रांचे काम सुरू असताना मराठ्यांच्या प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला अडथळे का येतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राचा दाखला

जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्राचा दाखला देत प्रमाणपत्र प्रक्रियेतील कथित विसंगतीवर प्रश्न उपस्थित केला. संबंधित विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले, तर त्याच्या बहिणीचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut Slams Narendra Modi: चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

या प्रकरणातून मराठा समाजातील गरिबांना वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत ‘मराठ्यांनाच अशी वेगळी वागणूक का?’ असा सवाल जरांगे यांनी केला.

दरम्यान, 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील पुढील चर्चा महत्त्वाची ठरणार असून, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कोणती भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maratha reservation manoj jarange angry kunbi certificate 29 august protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?
1

‘जरांगे आता संघर्ष योद्धा नाही, टेंडर योद्धा’, मनोज जरांगेंवर अजय बारस्करांचा हल्लाबोल, 3770 कोटींच्या टेंडरचा घोटाळा?

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
2

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
3

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
4

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.