Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत विरोधकांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेविकांनी सभात्याग केला. त्यानंतर नगरसेविकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला. या घटनेमुळे महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 02:40 PM
मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

Follow Us
Follow Us:
  • विरोधकांना बोलू दिले नाही!
  • शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग
  • सभागृहाबाहेर ठिय्या
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेत आज महासभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेविकांनी महासभेचा सभात्याग केला. त्यानंतर त्यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि सत्ताधारी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बागजी, वंदना पाटील आणि फ्रीडा डिमेलो यांनी सभात्याग करून सभागृहाबाहेर आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षाला चर्चेत सहभागी करून घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बोलण्याची संधीच दिली जात नाही

महासभेदरम्यान एखादा विषय किंवा सूचना मांडायची असल्यास ती आयुक्तांकडे मांडावी, अशी भूमिका महापौरांकडून घेतली जात असल्याचे नगरसेविकांचे म्हणणे आहे. मात्र, महानगरपालिकेच्या धोरणांवर आणि कोट्यवधी रुपयांच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महासभा बोलावली जात असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्याची संधीच दिली जात नसेल, तर महासभेत आम्हाला बोलावलेच का जाते, असा सवाल शिवसेना नगरसेविकांनी उपस्थित केला.

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

“महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला चर्चा करता येत नसेल, आमच्या सूचना मांडू दिल्या जात नसतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका काय?” असा सवाल आंदोलनकर्त्या नगरसेविकांनी उपस्थित केला. दरम्यान, मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपकडून “हिटलरशाही” सुरू असल्याचा गंभीर आरोप शर्मिला बागजी यांनी केला. शहरात शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सर्वश्रुत असून, त्याचा राग शिवसेनेच्या नगरसेवकांवर काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या प्रकारामुळे विशेष महासभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, विरोधकांना सभागृहात बोलण्याची संधी आणि लोकशाही पद्धतीने चर्चा करण्याचा अधिकार दिला जातो की नाही, यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष तीव्र

मिरा-भाईंदरच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष नवीन नाही. स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांमुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. आता हा संघर्ष महापालिकेच्या महासभेतील कामकाजातही दिसून येत असल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

शर्मिला बागजी यांनी केलेल्या ‘हिटलरशाही’च्या आरोपामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाला आणखी धार आली आहे. मात्र, या आरोपांवर भाजपकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. एकूणच, विरोधकांना बोलण्याची संधी, महासभेतील कामकाजाची पद्धत आणि सत्ताधारी-विरोधकांमधील वाढता संघर्ष यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Web Title: Mira bhayandar news municipal corporation shiv sena corporators walkout protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Mira Bhayndar : मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार
1

Mira Bhayndar : मिरा-भाईंदरमध्ये स्वयंपुनर्विकासाचा पाया रचणार, आमदार नरेंद्र मेहतांचा पुढाकार

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
2

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
3

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
4

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.